आनंद क्षणात शोकात बदलला! अपघातापूर्वीचा शेवटचा व्हिडीओ समोर, व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पानावतील..

Khed accident video viral : तिसऱ्या श्रावण सोमवारच्या पवित्र दिवशी खेड तालुक्यातील प्रसिद्ध कुंडेश्वरी मंदिराच्या दर्शनासाठी निघालेल्या पाईट पापळवाडी येथील महिला भाविक भक्तांचा आनंद क्षणात शोकात बदलला आहे. या महिला एका टेम्पोमध्ये अभंग गात भक्तीभावाचा प्रवास करत होत्या, मात्र या प्रवासात अचानक एक विघ्न आलं आणि सर्व होत्याचं नव्हतं करून गेलं. एका भीषण अपघातात तब्बल दहा महिलांनी आपला प्राण गमावला तर 29 महिला गंभीर जखमी असल्याचे समोर आले आहे. या भयानक घटने अगोदरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. तो व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.

हा अपघात होण्याअगोदर काही मिनिटापूर्वीच टेम्पोमध्ये हा व्हिडिओ काढण्यात आला होता. काळुबाई महिला बचत गटातील या सर्व महिला एकत्र बसून विठ्ठलाचे भजन गात प्रवासाचा आनंद घेत होत्या. पंढरीनामाचा बाजार इथे विठ्ठल विठ्ठल दुकानदार हे गाणं त्यांच्या तोंडातून ऐकू येत होते. चेहऱ्यावर भक्ती भाव आणि आनंद ओसडून वाहत होता. कोणालाही कल्पना नव्हती की पुढील काही क्षण त्यांच्या जीवनातील शेवटच्या असू शकतात. Khed accident video viral

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या सर्व घटनेची माहिती घेतल्यानंतर समोर आले आहे की या महिलांनी आठवडाभरापूर्वीच एकसारख्या पांढऱ्या रंगाच्या साड्या खरेदी केल्या होत्या. दर्शनाच्या दिवशी त्या साड्यांमध्ये सजून निघाल्या या महिलांचा आनंद पाहून तुमचेही हृदय भरून येईल. नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. दर्शन घेण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. अपघातानंतर संपूर्ण गाव शोकामध्ये आहे. मृत महिलांचे अंत्यसंस्कार गावात एकाच वेळी करण्यात आले. तेव्हा वातावरणात हळूहळू आणि अश्रूंचा पूर होता. व्यक्त करण्यासाठी गावकऱ्यांकडून संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आले. प्रत्येक घरातून दुःखाचा हुंदका ऐकू येत होता. ते दृश्य पाहून ज्या देवाचे महिला भजन करत होत्या त्या देवालाही रडू आवरलं नसेल.

हे पण वाचा| जंगलातील सिंह-मगरीचा थरार! ‘राजा’ ही हरला, सेकंदात पलटली बाजी; Video पाहून अंगावर येईल काटा

अपघातामधील टेम्पोचा चालक ऋषिकेश रामदास करंडे वय 25 याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जखमींवर तातडीने उपचार सुरू असून यातील काहींची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. राज्य सरकारने जखमीच्या उपचारांचा खर्च उचलण्याची घोषणा केली आहे. मृत महिलांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. श्रावण महिन्यातील भक्ती भाव विठ्ठल नामाचा गजर आणि आनंदी प्रवास एका क्षणात उध्वस्त झाला आहे. आजही त्या व्हिडिओत हसणारे चेहरे डोळ्यासमोर येतात मन भरून येत आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!