कृषी विद्यापीठात मोठी भरती; पगार मिळणार ₹63,200 त्वरित अर्ज करा


Krushi Vidyapeeth Bharti 2025 : राज्यातील नोकरीच्या सोडत असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कृषी विद्यापीठांमध्ये मोठी बंपर भरती निघालेली आहे. यामध्ये कशाप्रकारे तुम्ही अर्ज करू शकता रिक्त पदांची माहिती, वेतनश्रेणी, अर्ज करण्याची प्रक्रिया, अर्ज करण्याची तारीख या सर्व गोष्टींची माहिती खालील प्रकारे जाणून घ्या. Krushi Vidyapeeth Bharti 2025

राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणावरती गट-ड संवर्गातील पद भरती होणार आहे. विशेष म्हणजे, या भरती मध्ये प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी 50% आरक्षण देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासन या भरतीला मंजूर दिलेले असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे 529 रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे ही अर्ज प्रक्रिया 10 मार्च 2025 पासून सुरु होणार आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी योग्य त्या कागदपत्रांची तयारी करावी.

भरतीमध्ये समाविष्ट पदे आणि वेतन श्रेणी :

या भरतीत विविध पदांसाठी उमेदवारांना संधी मिळणार आहे वेतनश्रेणी एकूण पदसंख्या पुढीलप्रमाणे वाचा.

  • प्रयोगशाळा परिचय : 39 पदे ( वेतन श्रेणी: S-6, ₹19,900 -₹63,200 )
  • परिचर : 80 पदे ( वेतन श्रेणी : स1 , ₹15,000 – ₹47,600 )
  • चौकीदार : 50 पदे ( वेतनश्रेणी : S- 1 ₹15,000 – ₹47,600 )
  • ग्रंथालय परिचर : 5 पदे ( वेतनश्रेणी : S-1 , ₹15,000- ₹47,600 )
  • माळी : 8 पदे ( वेतनश्रेणी : S- 1, ₹15,000-₹47,600 )
  • मत्स्य सहाय्यक : 1 पद ( वेतनश्रेणी : S-1 , ₹15,000 – ₹47,600)
  • हॉल मॅन : 2 पदे ( वेतनश्रेणी : S-3, ₹16,600 -₹52,400)
  • मजूर : 344 पदे ( वेतन श्रेणी : S-3, ₹15,000 -₹47,600 )

प्रकल्पग्रस्त उमेदवारांना मोठा दिलासा !

या पद भरतीमध्ये प्रकल्पग्रस्त उमेदवारांना प्राधान्य देणार आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ज्या कुटुंबांची जमीन प्रकल्पासाठी संपादित केली आहे, त्यांना या भरतीत प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

निवड आणि ऑनलाइन परीक्षा

  • प्रयोगशाळा परिचर, परिचर, ग्रंथालय परिचर आणि हॉलमॅन या पदांसाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नावर आधारित असणार आहे. गुणवत्ता यादी स्थान मिळवण्यासाठी उमेदवारांना किमान 45% गुण मिळवणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया :

  • अर्ज करण्याची सुरुवात : दहा मार्च 2025 आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख अद्याप कृषी विद्यापीठाने जाहीर केलेली नाही लवकरच जाहीर होईल. अर्ज करण्याची प्रक्रिया संपूर्ण प्रक्रिया विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध असणार आहे.

हे पण वाचा | सरकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी! पगार मिळणार ₹15,000 रुपये, असा करा अर्ज

Leave a Comment

error: Content is protected !!