Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण पुन्हा एकदा या योजनेतील एक लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलेली आहे आणि जर तुमचे नाव यादीत नसेल तर यापुढे तुम्हाला लाभ मिळणार नाही हे देखील लक्षात ठेवा. या योजनेमध्ये पात्र असणाऱ्या महिलांना दीड हजार रुपये मानधन थेट खात्यात जमा केले जातात, हे आता सगळ्यांनाच माहीत आहे. पण त्यामागे आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे ते म्हणजे महिला अपात्र ठरवणे. निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती सरसकट महिलांच्या खात्यावरती लाभ जमा केला आणि त्यानंतर आता महिलांची नावे कट करण्यात येत आहे यामुळे महिलांमधून रोष व्यक्त केला जात आहे. कोणत्या महिला अपात्र ठरल्या पहा. Ladki Bahin Yojana
एक लाख महिला अपात्र
सरकारने आता नियमांची कठोरंबलबजावणी केली असून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातच 20000 महिलांचे वय या योजनेमध्ये बसत नाही. काही वीस वर्षाखालील तर काही 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या आहेत. तब्बल ८४००० हे अर्ज एकाच घरातील तीन महिलांचे असल्याचं पडताळणीत समोर आलं. त्यामुळे मिळून एक लाख चार हजार महिलांचे मानधन थांबवलं गेलं. अंगणवाडी सेविकांमार्फत छाननी सुरुवात राज्यभरात 26 लाख संशियत लाभार्थ्यांची तपासणी सुरू आहे. यानंतर जिल्ह्यात मोठी कपात होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी ही योजना सुरू करण्यात आली तेव्हा तहसील कार्यालयाचे, सेतू सेवा केंद्र, महा-इ- सेवा केंद्र सगळीकडे महिलांची झुंबड उडाली होती. कागदपत्र पूर्ण करण्यासाठी महिलांनी केलेली धावपळ माध्यमांनी दाखवली होती. पण आता चित्र बदलले गेल्या पाच महिन्यात नवीन अर्ज आलेच नाहीत. कारण एकच सरकारने निकषांची कात्री लावल्याने कागदपत्रांचा खटाटोप आणि धावपळ करून इमानदार मिळाल्याची खात्री उरलेली नाही.
जर तुम्ही देखील वरील निकषात असाल तर तुम्हाला यापुढे लाभ मिळणार नाहीये स्पष्ट करण्यात आलेला आहे जर तुमचं वय वीस वर्षाखालील असेल आणि जर 65 वर्षावरील असेल तर लाभ मिळणार नाही तसेच घरातील तीन महिलांना देखील लाभ मिळणार नाही. आता पुढे किती अपात्र ठरतात याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.