राज्यातील लाडकी बहीण योजनेमधील 84 हजार महिला अपात्र होणार? तुम्ही पण होणार का अपात्र पहा

Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. जर तुम्ही देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण यापुढे तुम्हाला लाभ मिळणे बंद होऊन होऊ शकते. त्याचे काही महत्त्वाचे कारण देखील आहे. हे चिंता करण्याचे कारण देखील आहे. कारण आत्तापर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावरती 21 हजार रुपये यशस्वीरित्या जमा झालेले आहेत. आता यापुढे देखील पैसे मिळणार का हा प्रश्न उपस्थित झालेला आहे त्यामुळे या योजनेत तुम्ही लाभार्थी असाल आणि पात्र ठरत असा तरी बातमी नक्की वाचा. Ladki Bahin Yojana

शासनाने घेतलेला नवीन निर्णयामध्ये, अनेक बोगस लाभार्थी उघडकीस आलेले आहेत. खोटी कागदपत्र, चुकीचा वय दाखवून किंवा एकाच घरात दोन पेक्षा जास्त महिलांनी अर्ज करून या योजनेचा फायदा घेतला असल्याचा समोर आलं. आणि याच कारणामुळे जवळपास एक लाख 25 हजार महिलांचा लाथ थांबवण्याची शिफारस शासनाकडे पाठवण्यात आलेली आहे.

शासनाने अंगणवाडी सेविका कडून गावोगावी सर्वे करून घेतला. सव्वा महिनाभर हा सर्वे चालला. प्रत्येक घरात जाऊन माहिती गोळा करण्यात आली. दोन तास सेविकांना दिले होते एक म्हणजे 65 वर्षावरील महिलांना या योजनेचा लाभ घेत आहेत का ते बघणं, आणि दुसरं म्हणजे एका घरात दोन किंवा त्याहून अधिक महिला योजनेचा फायदा घेत आहेत का हे तपासणं. यासाठी रेशन कार्ड हा मुख्य पुरावा मानला गेला. या तपासणीचा अहवाल शासनाकडे गेला आणि त्यातच आकडेवारी समोर आली.

या अहवालानुसार, 65 वर्षावरील असूनही 40,000 महिलांनी खोटी कागदपत्र दाखवून या योजनेचा लाभ घेतला समोर आल आहे. त्याशिवाय एकाच कुटुंबात दोन किंवा अधिक महिला लाभ घेत असलेले तब्बल 84 हजार 709 अर्ज आढळले. म्हणजे जवळपास दीड लाख महिलांना या तपासणीचा फटका बसणार आहे.

आता महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं आहे. काहींना दोन-तीन महिन्यांपासून हप्ते मिळाले नाहीत. त्याबद्दल त्यांना कळवण्यात आलं की तपासणी सुरू आहे. अनेक गरीब कुटुंबातील महिला म्हणतात, आम्हाला खरंच पैशाची गरज आहे, घर चालवण्यासाठी हा महत्त्वाचा आभार आहे. पण खोटं कागदपत्र कारणामुळे आता खऱ्यांना देखील दंड बसतोय.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचा अहवाल शासनाला पाठवण्यात आला. यामध्ये एकाच घरात चार लाखाहून अधिक अर्जाची तपासणी झाली आणि जवळपास 25% महिलांनी दोन पेक्षा जास्त लाभ घेतल्याचे स्पष्ट झालं. तर 65 वर्षावरील महिलांपैकी निम्म्याहून अधिक जणी अपात्र ठरल्या. शासनाचा या अहवालावर काय निर्णय घेते हे महत्त्वाचे आहे. कारण हा निर्णय ते दीड लाख महिलांच्या भवितव्याशी जोडलेला आहे. लाभ खरोखर पात्रांना मिळावा, अपात्रंना रोग का व यासाठी आता शासनाकडून पुढची पावलं काय असतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागल आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!