Ladki Bahin Yojana: 27 हजार लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत ₹1500; या महिलांना अपात्र का केलं?


Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आली असली तरी काही विशिष्ट निकषामुळे अनेक महिलांना या योजनेतून अपात्र ठरवले जात आहे. दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत 27 हजार 317 लाभार्थी महिलांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. पण या मागे नेमकी काय कारण आहे? कोणत्या कारणामुळे या लाडक्या बहिणी या योजनेतून वगळल्या जात आहेत? याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

अपात्र करण्यामागील प्रमुख कारणे:

लाडकी बहीण योजनेचा लाभ केवळ त्या महिलांनाच मिळेल, ज्या योजनेच्या निकषांमध्ये व सर्व अटी आणि शर्तीचे पूर्णपणे पालन करत आहेत. जर तुमच्या मनात प्रश्न असेल की मी या योजनेसाठी पात्र आहे का नाही? तर ही कारणे तुम्हाला स्पष्टपणे सर्व बाबी क्लिअर करतील. Ladki Bahin Yojana

  • जर तुमच्या कुटुंबातील कोणाकडेही चार चाकी वाहन असेल तर तुम्हाला या योजनेतून अपात्र ठरवले जाईल. यामागे सरकारचा उद्देश असा होतो की ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळावा.
  • जर तुम्ही आयकर भरत असाल तर तुम्हाला या योजनेतून अपात्र केले जाईल. आयकर भरणे हे चांगल्या आर्थिक स्थितीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांना प्राधान्य दिले जात आहे.
  • ज्या महिला नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांनाही लाडके बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. एकाच वेळी अनेक सरकारी योजनेचा लाभ घेण्यावर मर्यादा घालवण्याचा प्रयत्न सरकारचा आहे.
  • संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांनाही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवले जात आहे. याचा अर्थ जर तुम्ही आधीच कोणत्याही मोठ्या सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेतून वगळण्यात येणार आहे.
  • काही प्रकरणांमध्ये एकाच कुटुंबातील जास्त अर्ज असल्याने अर्ज बाद केले जात आहेत. कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार किंवा प्रत्येक कुटुंबातून एकाच व्यक्तीला लाभ देण्याच्या धोरणामुळे असे निर्णय घेण्यात आले आहेत.

हे पण वाचा | पोस्ट ऑफिसच्या या खास योजनेत एकदाच गुंतवणूक करा आणि मिळवा दरमहा ₹20,500; जाणून घ्या सविस्तर…

यवतमाळ जिल्ह्यात अपात्र ठरवलेल्या लाभार्थ्यांची संख्या तब्बल 27 हजार 317 महिला आहेत. योजनेच्या नियमामुळे मोठ्या संख्येने महिलांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. याचा अर्थ असा की योजनेची उद्दिष्टे साध्य करताना पात्रतेच्या कठोर निकषामुळे अनेक गरजू महिलांना या योजनेतून वगळले जात आहे. लाडके बहिण योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल असले तरी योजनेच्या पात्रता निकषामुळे अनेक महिला या योजनेतून अपात्र ठरवले जात आहेत.

सरकारचा उद्देश योग्य लाभार्थ्यापर्यंत आर्थिक लाभ पोहोचवण्याचा असला तरी या नियमांमुळे अनेक गरजू महिलांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावा लागत आहे. त्यामुळे गरजू महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे याचा पुरेपूर विचार सरकारने केला पाहिजे. यांनी निकषांमध्ये काही लवचिकता आणल्यास अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकेल आणि या योजनेचे ध्येय अधिक प्रभावशाली होईल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “Ladki Bahin Yojana: 27 हजार लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत ₹1500; या महिलांना अपात्र का केलं?”

Leave a Comment

error: Content is protected !!