Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि गरजू महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना सर्वत्र मोठ्या चर्चेत आहे. या योजनेअंतर्गत गोरगरीब महिलांना दरमहा 1500 रुपयाचा लाभ दिला जातो. लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला आहे, यानंतर जुलै महिन्याचा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे. दरम्यान या योजनेमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. या योजनेचा काही सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी कठोर कारवाई करण्याची घोषणा केली आहे.
राज्य सरकारने सुरू केलेली लाडके बहीण योजना राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत महिलांना मोठा आधार देत आहे. अनेक कुटुंबाच्या आवश्यक गरजा भागवण्यासाठी या योजनेचा वापर होत आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये महाडीबीटी द्वारे पाठवले जातात. जेणेकरून त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन स्वतःच्या पायावर उभा राहू शकतात.
हे पण वाचा| लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज! जुलै-ऑगस्ट महिन्याच्या हप्ता या तारखेला येणार? वाचा सविस्तर
ही योजना गरीब महिलासाठी असतानाही काही सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी नियमाचे पालन न करता योजनेचा लाभ घेतला आहे. ज्या महिलांना खरंच गरज नाही अशा अनेक महिलांनी सरकारी नोकरी करत असताना अर्ज भरून पैसे घेतले आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर काही महिलांनी आपल्या चुका लक्षात घेऊन योजनेचा लाभ परत केला आहे. पण अजूनही अनेक महिलांनी योजनेची रक्कम परत केलेली नाही. Ladki Bahin Yojana
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, ज्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी अपात्र असतानाही योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्यावर सरकारकडून कारवाई केली जाईल. तसेच आतापर्यंत मिळालेला सर्व लाभ त्यांच्याकडून वसूल केला जाणार आहे. त्यामुळे आता योजनेचा गैरवापर करणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करणार हे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या महिला कर्मचाऱ्यांच्या गैरवापरामुळे योग्य आणि गरजू महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही अशी भीती अनेकांना वाटत होती. मात्र मंत्री अदिती तटकरे यांनी हे स्पष्ट केले आहे की, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. योजना महिला सक्षमीकरणासाठी मजबूत पाऊल आहे आणि सरकारचे ध्येय गोरगरीब महिलांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनवणे आहे. त्यामुळे पात्र महिलांना कोणतीही काळजी करायची गरज नाही. शासनाने योजनेचे नियम व अटी सुरुवातीपासूनच स्पष्ट केल्या होत्या आणि त्यात कोणताही बदल केला जाणार नाही. या योजनेत ज्या योग्य महिला पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार.
2 thoughts on “Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहिणींना मोठा धक्का! योजनेचा गैरवापर करणाऱ्यांवर होणार कारवाई -आदिती तटकरे”