Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील लाखो महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहिण योजना सध्या मोठ्या चर्चेत आली आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे गरजूंना दरमहा 1500 रुपयाची मदत घेऊन त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी हातभार लावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. मात्र गेल्या काही महिन्यात या योजनेत प्रचंड गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान मिळालेल्या आकडेवारीनुसार सगळ्यात मोठा धक्का बसवणारी बातमी समोर येत आहे.
सोळा लाख लाडक्या बहिणी बोगस
योजनेच्या पडताळणी दरम्यान तब्बल 26 लाख 34000 महिला बोगस लाभार्थी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच ज्या पात्र नाहीत अशाही महिलांना या योजनेतून लाभ घेतला असल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक बोगस लाभार्थ्यांचा आकडा पुणे जिल्ह्यात निघाला असून या ठिकाणी मोठी खळबळ माजली आहे. सरकारच्या खजिन्यातून कोट्यावधी रुपये अपात्र महिलांनी घेतल्यामुळे खऱ्या गरीब पात्र महिलांना मात्र या योजनेपासून वंचित रहावे लागत होते.
लाडक्या बहिणींसाठी ई केवायसी अनिवार्य
आता सरकारने फसवणुकीला आळा घालण्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी महिलांनी ई केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. म्हणजेच पुढे पैसे मिळवायचे असतील तर लाडक्या बहिणींना ई केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. ज्या महिलांनी हे काम पूर्ण केले नाही त्यांना पुढील महिन्याचा हप्ता मिळणार नाही. Ladki Bahin Yojana
हे पण वाचा| या लाडक्या बहिणींना मिळणार नाही ₹1500 रुपये काय आहे कारण जाणून घ्या
दरम्यान राज्य सरकारने योजनेतील फेरफडतानी सुरू केली असून, इ केवायसी झाल्यानंतर खऱ्या लाभार्थ्यांना पैसे मिळतील. जून महिन्यापासून जवळपास 26 लाख महिला या योजनेतून अपात्र झाल्या आहेत. सध्या दोन कोटी 63 लाख लाभार्थ्यांपैकी फक्त दोन कोटी 41 लाख महिलांना या योजनेचा फायदा मिळाला आहे. जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या निकषा बाहेरून या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमचा अर्ज पुढील काही दिवसांमध्ये अपात्र होण्याची शक्यता आहे.
घरोघरी जाऊन होणार पडताळणी
या योजनेची पडताळणी फक्त कागदावरच नाही तर प्रत्यक्षात घरोघरी जाऊन केले जाणार आहे. अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन या योजनेची पडताळणी करणार आहेत. महिला खरोखर पात्र आहे का त्यांच्या घरी काय परिस्थिती आहे त्याचा पूर्ण आढावा घेऊन हे सर्व निकष ठरवले जाणार आहेत. ज्या महिला निकषांमध्ये बसत नाहीत त्यांना तात्काळ या योजनेतून बाद केले जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे काही महिलांचा लाभ बंद होणार असला तरी खरी आणि गरजू महिलांसाठी दिलासा देणारी बातमी ठरत आहे. कारण बोगस लोकांमुळे पात्र महिलांना वेळेवर पैसे मिळत नव्हते. आता केवायसी नंतर फक्त खरी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार आहे.
थोडक्यात सांगायचं झालं तर, जा लाडक्या बहिणींनी ई केवायसी केली नाही त्यांना पुढील महिन्यापासून एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे ज्यांना या योजनेचा लाभ हवा आहे त्यांनी वेळ न घालता लगेच ई केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे.
1 thought on “Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत मोठा बदल! ई-केवायसी करावीच लागणार, अन्यथा ₹1500 येणार नाहीत”