Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत जुलै महिन्याचे पैसे रक्षाबंधनाच्या निमित्त महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या प्रतीक्षेत महिला आहेत. अनेक महिलांसमोर ऑगस्ट महिन्याचा आता कधी मिळणार असा प्रश्न पडत आहे. राज्यातील लाखो महिलांसाठी सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेवर बराच गोंधळ निर्माण झाला आहे. सरकारने लाभार्थ्यांची फेरफडताळणी करण्यास सुरुवात केल्यामुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अनेक महिला या योजनेतून बाद करण्यात येत आहेत. पण आता याबाबत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठा दिलासा दिला आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे की, पात्र लाडक्या बहिणींचा एकही अर्जावर अन्याय होणार नाही. जे महिला खरोखर पात्र आहे तिला या योजनेचा नक्कीच लाभ मिळणार आहे. आदिती तटकरे यांच्या या घोषणेनंतर अनेक महिलांना दिलासा मिळाला आहे. ज्या महिला खरोखरच लाडके बहिण योजनेअंतर्गत पात्र आहेत त्यांना या योजनेचा लाभ नक्कीच मिळणार असे त्यांचे म्हणणे या वाक्यातून स्पष्ट होते. Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेत राज्यभरातून तब्बल अडीच कोटी महिलांनी लाभ घेतला होता. त्यापैकी प्राथमिक पडताळणीमध्ये 26 लाख महिला अपात्र झाल्या असल्याचे समोर आले आहे. यात अशा महिलांचा समावेश आहे ज्यांना इतर सरकारी योजनेचा आधीपासून लाभ मिळत होता, कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त होते किंवा एका घरात दोन पेक्षा जास्त महिलांना लाभ मिळत होता. या निकषाचे पालन न करणाऱ्या महिलांनाच या योजनेतून वगळण्यात आले आहे.
हे पण वाचा| लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर..
या सर्व शंका कुशांकावर पडदा टाकण्यासाठी अंगणवाडी सेविका आता घरोघरी जाऊन प्रत्यक्ष तपासणी करणार आहेत. त्या लाभार्थी महिलांना काही आवश्यक प्रश्न विचारणार आहेत. यामध्ये नियमाबाह्य लाभ घेतलेल्या महिला लक्षात येतात त्यांना या योजनेतून अपात्र केले जाणार आहे. मात्र नियमात असून देखील महिलांचे पैसे बंद झाले असले तर त्यांना पुन्हा या योजनेत सामावून घेतल्या जाणार आहे. यासाठी ज्या महिला पात्र असून या योजनेतून बात केल्या आहेत त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, सध्या मिळालेल्या माहितीनुसार अंतिम निर्णय घेण्यात येईल. प्रत्येक प्रकरणात सखोल तपासणी होणार आहे. काही अर्ज पहिल्याच टप्प्यात बाद झाले तर काहींना दुसऱ्या तपासणीत पात्र ठरवण्यात येईल. या पात्र महिलांचा हक्क कोणीही घेऊ शकणार नाही. योग्य लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
गेल्या काही दिवसापासून या योजनेतून अनेक महिला अपात्र होत असल्याचे सोशल मीडियावर चर्चा होत आहे. काही महिलांनी नाराजी व्यक्त केली तर काहींनी आशेचा किरण धरून ठेवलंय. ग्रामीण भागात तर अनेकांनी अर्ज फॉर्मच्या पावत्या हातात धरून अंगणवाडी सेविकाकडे प्रश्नांची उत्तरे मागण्यास सुरुवात केली. सरकारनामात्र स्पष्ट केले की हा सगळा प्रकार पारदर्शक पद्धतीने होणार आहे. योजनेचा उद्देश गरजूंना आर्थिक आधार देणे हा असला तरी अनेक गरजू या योजनेतून अपात्र होत असल्याचे देखील समोर आले आहे.
लाडकी बहीण योजना केवळ पैशाचा लाभ नाही तर राज्यातील गोरगरीब महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे. पडताळणीच्या प्रक्रियेमध्ये तात्पुरता गोंधळ निर्माण झाला असला तरी योग्य लाभार्थ्यांना पुन्हा पात्र करून त्यांच्या खात्यात या योजनेचा लाभ जमा होऊन शकतो. यासाठी महिलांनी सय्यम ठेवणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे.
1 thought on “Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! आदिती तटकरेंनी केली मोठी घोषणा…”