Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात आजकाल गावोगावी एकच चर्चा रंगतेय अगं नोव्हेंबरचे पंधरा शंभर आलेत का तुझ्या खात्यात? पण बहुतेकांच्या मोबाईलवर अजून मेसेजच नाही, बँकेत जाऊन बॅलन्स तपासला तरी काही हलचल नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये थोडी काळजी, थोडी कधी येणार हे पैसे? असा प्रश्न सगळ्यांच्या मनात फिरतोय. Ladki Bahin Yojana
महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेल्यावर्षी सुरू झाल्यापासून लाखो महिलांसाठी मोठा आधार ठरली. घरात उत्पन्न कमी, मुलांचे शिक्षण, घरखर्च, औषधं–दवाखाना… अशा वेळी दर महिन्याला मिळणारे १५०० रुपये अनेकांच्या संसाराला हातभार लावतात. पण या महिन्यात मात्र नोव्हेंबर जवळजवळ संपत आला तरी हप्ता खात्यात न आल्याने अनेकांचे डोळे रस्त्याकडे लागलेत.
सरकारकडून पडताळणी सुरू झाल्यानंतर ई-केवायसीची अट घालण्यात आली, काही महिलांचे कागदपत्र अपूर्ण, बँक माहितीमध्ये चुका… असे प्रकार समोर आल्यामुळे योजना काही दिवस चर्चेत राहिली. त्यामुळेच ई-केवायसीची मुदत वाढवून ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत करण्यात आली. पण तेवढ्याने बहिणींच्या मनातील नोव्हेंबरच्या हप्त्याबाबतची शंका मात्र कमी झाली नाही.
आज २० तारीख उजाडली, महिन्याचा शेवटही जवळ आलाय, तरी बहुतेकांच्या खात्यात अजून या महिन्याचे पंधरा शंभर जमा झालेले नाहीत. सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू असल्याने आचारसंहितेमुळे हप्ता थांबला की काय? अशीहि चर्चा गावोगावी ऐकू येत होती. पण सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार, बहिणींनो काळजी करू नका नोव्हेंबरचा हप्ता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा केला जाणार आहे.
सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी विभागांतर्गत हालचाली सुरू असल्याची माहिती मिळतेय. निवडणुकीच्या आधीच महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी चर्चा जोरदार सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत खात्यात मेसेज येण्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत.
लाखो बहिणींच्या डोळ्यात अपेक्षेची एकच वाट आता तरी पैसे कधी येतात? पण मिळालेल्या अपडेटनुसार, हा हप्ता थांबलेला नाही, फक्त प्रक्रियेचे काम पूर्ण होत आहे. शेवटचा आठवडा सुरु होताच बऱ्याच खात्यांमध्ये रक्कम येण्याची शक्यता जास्त आहे.
योजना सुरू झाल्यापासून अनेक महिलांनी घरातील छोट्या मोठ्या खर्चांवर ही मदत वापरली आहे. त्यामुळे हप्ता उशिरा आला की घरातली चिंता वाढतेच. पण यावेळीही हा हप्ता मिळणारच आहे… फक्त थोडी वाट पाहण्याची गरज आहे.
हे पण वाचा | लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर
