Ladki Bahin Yojana: राज्यातील लाखो महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपयांचा लाभ घेत आहेत. या सर्व महिलांच्या नजरा सध्या एकाच गोष्टीकडे लागल्या आहेत ते म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार? कारण ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा संपला आहे तरीदेखील महिलांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता अजूनही मिळालेला नाही. त्यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. आता प्रसार माध्यमांमध्ये एकच चर्चा रंगली आहे की सप्टेंबर आणि ऑक्टोबर चा हप्ता एकत्रित दिवाळीनिमित्त भेटू शकतो.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू झाल्यापासून महिलांना दरमहा 1500 रुपयांच्या आर्थिक मदत करत आहे. मात्र गेल्या काही महिन्यापासून या योजनेचा हप्ता वेळेवर मिळत नाही. मागील काही महिन्यापासून या महिन्याचा हप्ता पुढील महिन्यात महिलांना मिळत आहे. सप्टेंबर महिन्यात देखील तेच घडलं आहे. अनेक महिलांनी या योजनेची ई-केवायसी पूर्ण केली असली तरी त्यांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे आता महिलांच्या ग्रुपमध्ये एकच चर्चा रंगली आहे. या महिन्याचा हप्ता आलाच नाही, काही महिलांनी तर बँकेत देखील चौकशी केली आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर बोनस मिळू शकते?
राज्य सरकारचा आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर सणासुदीचे निमित्य साधून अनेकवेळा महिलांना या योजनेचा हप्ता देण्यात आला आहे. त्यामुळे आता दिवाळी येत आहे आणि हा महिलांसाठी मोठा सण मानला जातो. या सणानिमित्त महिलांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत म्हणून लाडकी बहीण योजनेच्या दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये दिले जाऊ शकतात. सरकार दिवाळीपूर्वीच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रित महिलांच्या खात्यात जमा करू शकते. मात्र सरकारकडून याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. महिलांना असे वाटत आहे की, काही दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून याबाबत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे पण वाचा| राज्यातील शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रूपयांचं पॅकेज मंजूर; कोणत्या नुकसानाला किती मदत मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती
ई–केवायसी केल्याशिवाय हप्ता मिळणार नाही
राज्य सरकारने मागील काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या अटीमध्ये बदल केला आहे. आता ज्या महिला ई केवायसी पूर्ण करतील त्याच महिलांना हप्ता मिळणार आहे. सरकारने यासाठी दोन महिन्याची मुदत देखील दिली आहे. अनेक महिलांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे मात्र अनेक महिला केवायसी साईट चालत नसल्यामुळे प्रलंबित आहेत. ज्या महिलांनी अजूनही केवायसी केली नाही त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी नुकतेच सांगितले होते की, खऱ्या लाभार्थ्यांनाच या योजनेअंतर्गत लाभ मिळावा म्हणून केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अजूनही हे काम केले नाही त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार याबाबत अजून अधिकृत घोषणा झाली नाही मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर चा हप्ता एकत्रित दिवाळीपूर्वी मिळण्याची शक्यता प्रबळ आहे. राज्य सरकारकडून लवकरच याबाबत अपडेट देण्यात येईल अशी आशा वर्तवली जात आहे. त्यामुळे महिलांनी संयम ठेवा केवायसी पूर्ण करून घ्या आणि खात्यात पैसे कधी जमा होतील याकडे लक्ष ठेवा. लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदत देणारी योजना नसून, ही महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सरकारकडून या योजनेचा हप्ता देण्यास उशीर झाला तरी, महिलांना या लाभाचा मोठा फायदा होताना दिसत आहे. दिवाळी सारख्या मोठ्या सणात या योजनेत हप्ता मिळाला तर लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल.
