Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आनंदाचे बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपयांचा थेट लाभ लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो. या योजनेचा लाभ घेऊन अनेक कुटुंबीयांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होतात. यंदा रक्षाबंधन सणानिमित्त हा हप्ता मिळाल्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. रक्षाबंधनाच्या आधीच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
गावोगावातील महिलांनी आज आपल्या मोबाईलवर बँक बॅलन्स तपासण्यास सुरुवात केली आहे. काहींनी पासबुक घेऊन बँकेची वाट धरले आहे तर काही आपल्या मुलांना किंवा नातेवाईकांना विचारत आहेत. ज्या महिलांच्या खात्यात 1500 रुपयांचा हप्ता जमा झाला त्यांच्यासाठी ही रक्कम केवळ आकडा नाही तर रक्षाबंधनासाठी खास गिफ्ट आहे. तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला का नाही? Ladki Bahin Yojana
रक्षाबंधनाचा दिवस म्हणजे भाऊ बहिणींच्या प्रेमाचा उत्सवाचा दिवस असतो. या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिला भेटवस्तू देतो. पण यावर्षी राज्य सरकारनेच राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना खास भेट दिली आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी याआधीच आश्वासन दिले होते की रक्षाबंधन आधीच महिलांच्या खात्यात जुलै महिन्याचा आता जमा करू, आणि त्यांनी म्हटलं तसं त्यांच्या आश्वासन पूर्ण करून दाखवला आहे. या पैशाचा उपयोग अनेक महिला घरगुती वस्तू आणण्यासाठी मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी औषध घेण्यासाठी किंवा छोटा मोठा सण साजरा करण्यासाठी करतात.
तुमच्या खात्यात पैसे आले का नाही कसे तपासावे?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारकडून तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का नाही हे तपासण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. पण ग्रामीण भागात अजूनही बँकेत जाऊन रांगेत उभा राहावे लागते. त्यामुळे महिलांनी शक्य असल्यास ऑनलाईन पद्धतीने तपासावे.
हे पण वाचा| लाडक्या बहिणींना रक्षाबंधननिमित्त खास भेट! या दिवशी जमा होणार 1500 रुपये; तारीख आणि वेळ निश्चित
ऑनलाइन पद्धत
- आपल्या बँकेच्या मोबाईल ॲप वर किंवा इंटरनेट बँकिंग मध्ये लॉगिन करा.
- बॅलन्स किंवा ट्रांजेक्शन हिस्ट्री तपासा.
- त्या ठिकाणी ladki bahan Yojana किंवा DBT TRANSFER अशा नावाने आलेले 1500 रुपये लाडकी बहिणी योजनेचे आहेत.
ऑफलाइन पद्धत
- सर्वप्रथम जवळच्या बँक शाखेत जा.
- पासबुक वर एन्ट्री करून पहा.
- तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे का नाही याची खात्री करून घ्या.
- काही ठिकाणी एटीएम मशीन मध्ये देखील बॅलन्स तपासता येतो.
लाडकी बहिणी योजना केवळ पैशाचा हप्ता मिळावा यासाठी नाही तर अनेक महिलांच्या आत्मविश्वासावर भर घालण्यासाठी खूप महत्त्वाची ठरत आहे. घरातील खर्चासाठी नेहमीच इतरांवर अवलंबून राहावं लागतं. पण दर महिन्याला मिळणारे 1500 रुपयांमुळे महिलांचे स्वतःचे पैसे घर खर्चामध्ये उपयोगी पडत आहेत. शहरातील महिला असो किंवा गावातील महिला लाडकी बहिणी योजनेचे पैसे आले म्हटले की त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद आणि समाधान दिसते.
राज्य सरकार या योजनेत सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. जुलैचा आता वेळेवर आणि रक्षाबंधनाच्या आधी मिळाल्याने लाभार्थ्यांचा विश्वास सरकार वरचा वाढला आहे. काही महिलांनी तर सोशल मीडियावर सरकारचे आभार देखील मानले आहे. रक्षाबंधन हा प्रेमाचा आणि विश्वासाचा सण आहे. राज्य सरकारने यावर्षी या सणाला एक वेगळाच रंग दिला आहे. या सर्व निमित्त महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर वेगळाच तेज दिसायला लागले आहे. ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्यांनी घाई न करता पुढील दोन-तीन दिवसात तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. कारण हा हप्ता टप्प्याटप्प्यामध्ये महिलांच्या खात्यात जमा केला जात आहे.
2 thoughts on “Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्याचे ₹1500 जमा होण्यास सुरुवात! तुमच्या खात्यात जमा झाले का नाही?”