सावधान! लाडकी बहीण योजनेची eKYC करताय? रिकामे होऊ शकते बँक खाते, स्कॅम समोर

Ladki Bahin Yojana eKYC Scam Alert: राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. या योजनेतून लाखो महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र आता या योजनेत पारदर्शकता निर्माण करण्यासाठी सरकारने ekyc करणे अनिवार्य केले आहे. दरम्यान ही केवायसी प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. तुम्हीदेखील केवायसी प्रक्रिया करण्याचा विचार करत असाल तर सावध व्हा कारण ई केवायसी प्रक्रियेवर आता स्कॅमच संकट निर्माण झाला आहे.

लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये राज्य सरकारने सुरू केली आहे. 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना या योजनेतून दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. सध्या तब्बल 2.25 कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. राज्यातील महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होव्यात या साठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्यापर्यंत लाभ महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. यानंतर महिलांना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. लवकरच या महिन्याचे देखील 1500 महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.

राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी दरवर्षी ekyc करणे आवश्यक आहे. यासाठी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे. यामागे सरकारचा उद्देश सरळ आहे. या योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळावा आणि भविष्यात डिजिटल सत्यापन सुलभ करता यावं. पण केवायसी प्रक्रियेत काही गैरप्रकार होत असल्याचे समोर आले आहे.

हे पण वाचा| शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 2,215 कोटी रुपयांची मदत जाहीर; फडणवीस सरकारचा निर्णय

स्कॅम वेबसाईटचा सापळा

सध्या गुगलवर लाडकी बहीण योजनेची ई केवायसी असं सर्च केलं तर अनेक बनावटी वेबसाईट समोर येतात. यापैकीच एक hubcomut.in नावाची एक वेबसाईट समोर आली आहे. या वेबसाईटवर कोणीही आपली वैयक्तिक माहिती, बँक खात्याची माहिती किंवा ओटीपी टाकल्यास त्यांचे बँक खाते पूर्णपणे रिकामे होण्याची भीती आहे. यामुळे लाखो महिलांनी या फसवणुकीच्या जाळ्यात सापडू नये असा इशारा देण्यात आला आहे. Ladki Bahin Yojana eKYC Scam Alert

सरकारचं आवाहन

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, ई–केवायसी फक्त अधिकृत सरकारी वेबसाईटवरच करावी. अन्य कोणत्याही वेबसाईटवर दिलेली माहिती धोक्याची ठरू शकते. सरकारने अधिक सांगितले आहे की बनावट वेबसाईट पासून सावध रहा कोणत्याही दुसऱ्या वेबसाईटवर विश्वास ठेवू नका. मोबाईलवर आलेल्या कोणत्याही लिंक वर क्लिक करून आपली माहिती शेअर करू नका.

ई–केवायसी का केली जात आहे?

राज्यात सुमारे 26 लाखापेक्षा जास्त अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचे तपासात समोर आला आहे. एवढेच नाही तर काही ठिकाणी पुरुषांनीही महिलांच्या नावाने लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचावा आणि अपात्र महिलांना या योजनेतून वगळावे यासाठी सरकारने ई–केवायसी करण्याची अट घातली आहे. लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषाचे पालन न करणाऱ्या महिला देखील या अटीमुळे या योजनेतून अपात्र होतील.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “सावधान! लाडकी बहीण योजनेची eKYC करताय? रिकामे होऊ शकते बँक खाते, स्कॅम समोर”

Leave a Comment

error: Content is protected !!