अखेर सरकारने तो निर्णय घेतलाच! लाडक्या बहिणींना एकाच वेळी मिळाल्यात दोन मोठ्या Good News या 2 मागण्या झाल्यात मान्य

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणी गेल्या काही दिवसांपासून एकाच प्रश्नाने हैराण झाल्या होत्या“e-KYC ची तारीख वाढणार का? वेळेत जमलं नाही तर हप्ता बंद होईल का?” गावोगावी महिला केंद्राच्या, महावितरणच्या, तालुक्याच्या ऑफिसात रांगा लागल्या होत्या. अनेक बहिणींचं काम अर्धवट अडकलेलं होतं. कारण पती किंवा वडील हयात नसतील तर e-KYC करताना सिस्टम पुढे जात नव्हती. या सगळ्या त्रासात अचानकच आलेल्या निवडणुकांमुळे सरकारवर प्रचंड दबाव वाढला होता. आणि शेवटी, अखेर सरकारने लाडक्या बहिणींच्या मनातला ताण पूर्णपणे दूर करणारा मोठा निर्णय घेतलाय. Ladki Bahin Yojana

मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती दिल्यानंतर राज्यभरात दिलासा पसरला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना 2024 पासून सुरू झाल्यापासून महिलांनी यात प्रचंड सहभाग घेतला. महिन्याला 1500 रुपये घरातील किराणा असो, मुलाचा खर्च असो, डॉक्टरांना दाखवणं असो या पैशांनी कित्येक घरांचा आधार बनला. जुलै 2024 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत एकूण 16 हप्ते जमा झाले आणि आता पुढचा हप्ता निवडणुका पूर्ण झाल्यावर महिलांच्या खात्यात जाणार आहे. पण या सगळ्यात मोठा अडथळा होता e-KYC. सरकारकडून आधी अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2025 दिली होती. आणि मोठ्या बहिणींची केवायसी बाकी असल्याने लाखो महिला तणावात होत्या वेळेत नाही झालं तर नाव वगळतील का? हप्ता थांबेल का?

पतीचं किंवा वडिलांचं कार्ड नसल्यामुळे आपलं काय?”

कोट्यवधी महिलांची ही अडचण आणि त्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती, दुष्काळी परिस्थिती, वाहतूक बंद, गावोगावी नेटवर्कची अडचण या सगळ्याचा विचार करून सरकारनं अखेर आज मोठा निर्णय घेतला.

सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलं की लाडकी बहीण योजनेच्या e-KYC करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली असून नवी अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 आहे!

हा निर्णय जाहीर होताच सोशल मीडियावर, गावोगावी, महिला बचतगटांच्या मिटिंगमध्ये, अंगणवाडीसमोर महिलांमध्ये आनंद पसरला. “चला, आता शांतपणे e-KYC करता येईल” असा आवाज ऐकू येऊ लागला. पण दुसरी मोठी गुड न्यूज आणखी महत्त्वाची आहे.

आतापर्यंत ज्यांच्या वडील किंवा पती हयात नाहीत, घटस्फोट झालाय, किंवा वेगळं राहतातत्यांना e-KYC करताना सिस्टम अडकत होती. अशा महिला मंजूरी असूनही प्रक्रिया पुढे जाऊ शकत नव्हत्या. सरकारनं यावर आता मोठा बदल जाहीर केलाय

ज्या लाभार्थी महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत, किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या महिला स्वतःचे e-KYC करून मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोट प्रमाणपत्र न्यायालय आदेश याची साक्षांकित प्रत जिल्ह्याच्या महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करू शकतात. यामुळे हजारो महिलांची अडचण थेट संपली आहे.तालुक्यातल्या अंगणवाडी सेविका, महिला विकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्याकडे दिवसभर फोन लागत होते “माझ्या नवऱ्याचं कार्ड नाही, काय करू?”“वडील हयात नाहीत, e-KYC होत नाही…”आता हा प्रश्नच संपला आहे.

सरकारकडून सांगण्यात आलं की राज्यात योजनेचं काम अतिशय वेगाने आणि प्रामाणिकपणे सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पुढाकाराने लाडकी बहीण योजनेला सातत्य मिळालं आहे. महिलांच्या नाराजीचा प्रश्नही सरकारने गांभीर्याने घेतला आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला.आता एकच संदेश ज्या भगिनींचं e-KYC बाकी आहे, त्यांनी 31 डिसेंबरपूर्वी शांतपणे प्रक्रिया पूर्ण करावी. कारण पुढील हप्ता थेट खात्यात जमा होणार आहे आणि त्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून ही मुदतवाढ खूप मोठा दिलासा आहे.

हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रात या दिवसापासून होणार मुसळधार पाऊस…

Leave a Comment

error: Content is protected !!