लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! या दिवशी मिळणार जून महिन्याचे 1500 रुपये? अजितदादांची मोठी घोषणा..


Ladki Bahin Yojana: मागील काही दिवसापासून महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणी जून महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना जून महिन्याचे 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न सर्वत्र पडला होता. मात्र आता याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी एक महत्त्वाची आणि दिलासा देणारी घोषणा केली आहे. लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा या घोषणेनंतर आनंद दिसत आहे.

काय म्हणाले अजित पवार?

29 जून रोजी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत मोठी माहिती दिली आहे. अजित पवार म्हटले की, राज्य सरकारने एकूण 3600 कोटी रुपये थेट निधी लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर केला आहे. या योजनेअंतर्गत दिला जाणारा दरमहा 1500 रुपयांचा लाभ महाडीबीटी द्वारे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात उद्यापासून जमा होईल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, 30 जून रोजी पासून लाडक्या बहिणींना हे पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे. याची पूर्ण प्रक्रिया सुरू झाली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे लवकरच मिळणार आहेत हीच बातमी लाडक्या बहिणीसाठी मोठ्या आनंदाची ठरत आहे.

हे पण वाचा| पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये कधी जमा होणार? असे चेक करा लाभार्थी यादीत तुमचे नाव

लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद

मागील काही दिवसापासून लाडक्या बहिणी पुढील हप्ता कधी मिळेल याबाबत सातत्याने प्रश्न विचारत होत्या. अनेक महिलांनी आपल्या आर्थिक गरजांसाठी या निधीचा उपयोग केला आहे. अनेक महिलांनी त्यांचे घर चालवण्यासाठी या निधीचा उपयोग केला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना त्यांच्या दैनंदिन जीवन जगण्यासाठी हा लाभ खूप मोलाचा ठरत आहे. एखादा सण समारंभ असो किंवा दैनिक खर्च या योजनेमुळे महिलांना मोठा आधार मिळाला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या या घोषणेने त्यांच्या मनातील चिंता दूर झाले असून अनेक महिला स्वतःचा आनंद व्यक्त करत आहे.

राज्यातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहिणी योजना सर्वत्र सुप्रसिद्ध झाली आहे. आर्थिक स्वावलंबीपणामुळे महिलांना समाजात सन्मानाचे स्थान मिळत आहे. 1500 रुपयांच्या या आर्थिक मदतीमुळे अनेक कुटुंबीयांना त्यांचे घर चालवण्यासाठी मोठा हातभार लागत आहे. ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा मोठा फायदा होत असताना दिसत आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे सर्व महिला कौतुक करत आहेत. Ladki Bahin Yojana

लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले की अनेक लाडक्या वहिनी आपले रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी तयार आहेत. ही केवळ आर्थिक मदत नसून महिलांच्या आत्मविश्वासाला बळ देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे ज्या महिलांनी आतापर्यंत संयम राखला होता त्यांना आता फक्त आपले बँक खाते तपासण्याचे प्रतीक्षा आहे. उद्यापासून म्हणजेच 30 जून पासून हा आनंद राज्यातील प्रत्येक लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या डोळ्यात दिसेल.

Disclaimer: वरी दिलेली माहिती प्रसार माध्यमांच्या आधारे आहे. ही माहिती पूर्णपणे योग्य आहे याचा आम्ही कुठल्याही प्रकारे दवा करत नाहीत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! या दिवशी मिळणार जून महिन्याचे 1500 रुपये? अजितदादांची मोठी घोषणा..”

Leave a Comment

error: Content is protected !!