Ladki Bahin Yojana | महिलांनो जर तुम्ही देखील राज्य सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी वाचून तुम्हाला नक्कीच दिलासा मिळणार आहे. कारण काही प्रसार माध्यमांच्या आधारे लाडक्या बहिणींना एकत्रित दोन्ही महिन्याचे पैसे खात्यावरती जमा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सध्या सनासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत. आणि त्यापूर्वी सगळ्यात मोठा भाऊ- बहिणीचा सण म्हणजे रक्षाबंधन आणि याच सणाचे औचित्य साधून सरकार लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये एकत्रित देणार असलेच म्हटले जात आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. Ladki Bahin Yojana
लाडक्या बहिणींना एकत्रित ₹3000 हजार रुपये मिळणार?
दर महिन्याच्या शेवटी व सुरुवातीला एक सध्या चर्चा सुरू होती ती म्हणजे लाडक्या बहिणींना हप्ता कधी मिळणार? राज्य सरकारकडून आलेल्या अपडेट नुसार, लाडक्या बहिणींना यंदा जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते तीन हजार रुपये एकत्रित मिळणार अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. परंतु याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. परंतु ही चर्चा राज्यामध्ये सुरू होणाऱ्या सणासुदीमुळे वर्तवण्यात येत आहे. रक्षाबंधन निमित्त सरकार महिलांना तीन हजार रुपये देणार अशी माहिती आहे. परंतु अजूनही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही, त्यामुळे प्रतीक्षा कायम आहे.
एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे की, हप्ता दर महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्याच्या पाच तारखेपर्यंत दिल्या जाणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच रक्कम मिळेल अशी शक्यता आहे. पण सरकारची गती आणि सिस्टम वरचा ताण लक्षात घेता लाडक्या बहिणींवरती चिंतेचे सावट आहे. कारण अनेक लाडक्या बहिणींना अजूनही मागील महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत.
हे पण वाचा| डक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जुलै महिन्याचे ₹1,500 लवकरच बँक खात्यात जमा होणार..
दुसरीकडे या योजनेमध्ये 14 हजार हून अधिक पुरुषांनी बनावट अर्ज करून तब्बल 21 कोटी रुपये उचललेले आहेत. अनेकांनी महिलांचे खाते असल्याचे दाखवून ही रक्कम उचलली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर समाजामध्ये संतापताची लाट उसळी आहे. यावर त्यात कठोर कारवाई करत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. Ladki Bahin Yojana
एवढेच नव्हे तर यामध्ये दोन हजार हून अधिक सरकारी कर्मचारी महिलांनी देखील लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आलेला आहे. यामध्ये सहावे सातवा वेतन लागू असलेले देखील आहेत, तर उच्च पगार घेणारे सरकारी कर्मचारी असल्याचे देखील उघडकीस आलेला आहे. सरकारने यावरती कडक भूमिका घेतली असून, या सर्वांकडून चुकीच्या पद्धतीने घेतलेली रक्कम वसूल केली जाणार आहे.
ही योजना सुरू झाल्यानंतर दोन कोटींपेक्षा अधिक महिलांना दरमहा ₹1500 रुपये मिळत आहेत. घर चालवणाऱ्या, विधवा, घटस्फोटीत, अपंग आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत महिलांसाठी ही रक्कम आशेच किरण आहे. पण ज्या महिलांना वेळेवर पैसे मिळत नाहीत, त्या महिला बँकेचे बॅलन्स चेक करत आहेत आणि आमचे पैसे कधी मिळतात असा प्रश्न निर्माण होत आहे.
शेवटी एवढेच सांगायचं आहे लवकरच सरकार तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करणार आहे. परंतु सरकारकडून अद्याप कोणतीही माहिती स्पष्ट करण्यात आलेली नाही. ही माहिती प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे तसेच तीन हजारांचा हप्ता जर महिलांना मिळाला, तर सणासुदीच्या काळामध्ये ही एक मोठी मदत महिलांसाठी होणार आहे. आता यावर सरकार कोणती भूमिका घेणार व निर्णय घेणार याकडे राज्यातील सर्व महिलांचे लक्ष लागले आहे.
1 thought on “लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज! जुलै-ऑगस्ट महिन्याच्या हप्ता या तारखेला येणार? वाचा सविस्तर”