Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेची E-KYC कशी करावी? कोणती कागदपत्रे लागणार? शेवटची तारीख काय? वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू झाल्यापासून राज्यातील लाखो महिलांना दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक आधार दिला जात आहे. गोरगरीब महिलांना घर खर्च भागवण्यासाठी मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी या पैशाचा उपयोग केला जात आहे. मात्र आता या योजनेत सरकारने नवीन नियम लागू केला आहे. राज्यातील सर्व लाभार्थी महिलांना आता दरवर्षी ई के वर्षी प्रक्रिया करणे अनिवार्य करण्यात आले आहे. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी यासंदर्भात स्पष्ट माहिती दिली आहे.

ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख काय?

सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाचा गैरप्रकार रोखण्यासाठी व योजनेत पारदर्शकता निर्माण करण्यासाठी E-KYC करणे सक्तीचे केले आहे. या योजनेचे दरवर्षी केवायसी करावी लागणार आहे. यासाठी महिलांना दोन महिन्याची मुदत देण्यात आली आहे. म्हणजेच ज्या महिलांनी अजून E-KYC केलेली नाही त्यांना ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी लागणार आहे. सरकारने दिलेल्या तारखेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास या योजनेचा लाभ बंद होऊ शकतो. दरवर्षी जून आणि जुलै या दोन महिन्यात ही E-KYC प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

E-KYC करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • नाव, वय, पत्ता याची संपूर्ण माहिती

हे पण वाचा| लाडक्या बहीणींसाठी महत्वाची बातमी! दरमहा ₹1500 मिळवण्यासाठी आता करावं लागणार ‘हे’ काम, अन्यथा…

E-KYC कशी करावी?

लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया अगदी सोपी ठेवण्यात आली आहे. जेणेकरून गावातील महिलांना मोबाईलवर ही प्रक्रिया करता यावी. ज्या महिलांना ही प्रक्रिया मोबाईलद्वारे करता येत नाहीत त्या महिला जवळील ऑनलाइन सेंटरवर जाऊन देखील करू शकतात. Ladki Bahin Yojana

  • ई-केवायसी करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे.”हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर नवीन पेज उघडेल, त्या ठिकाणी लाभार्थी महिलांचा आधार क्रमांक टाका.
  • त्यानंतर खाली कॅप्चर कोड टाकून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्या.
  • त्यानंतर ओटीपी पाठवा या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर एक ओटीपी प्राप्त होईल तो ओटीपी अचूक भरा.
  • यानंतर तुमच्या घरात किती महिला लाभार्थी आहेत असा प्रश्न विचारला जाईल त्या प्रश्नाचे योग्य उत्तर द्या.
  • त्यानंतर वडीलाचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाका.
  • वडिलांच्या किंवा पतीच्या आधारवर आलेला ओटीपी अचूक भरा आणि शेवटी सबमिट बटनावर क्लिक करा.
  • अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता.

ई-केवायसी न केल्यास काय होणार?

सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर तुम्ही ई केवायसी केली नाही तर काय होणार? जर लाभार्थी महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास दरमहा मिळणारे 1500 रुपयांचा लाभ बंद होणार आहे. म्हणजेच ज्यांनी प्रक्रिया पूर्ण केले नाही त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की ही प्रक्रिया फक्त लाभार्थ्यांची खरी ओळख पटवण्यासाठी आहे. त्यामुळे फसवणूक थांबेल आणि योग्य महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचेल. ग्रामीण भागातील महिलांना ई–केवायसी करण्यास अडचण निर्माण होऊ नये यासाठी त्या ठिकाणी मदत देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेची E-KYC कशी करावी? कोणती कागदपत्रे लागणार? शेवटची तारीख काय? वाचा सविस्तर”

Leave a Comment

error: Content is protected !!