Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचे पैसे 11 सप्टेंबर 2025 रोजी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. यानंतर महिलांना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात उशिरा जमा झाला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील उशिरा मिळणार का असा प्रश्न महिलांना पडत आहे. या लेखात आपण याचबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
ऑगस्ट महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाल्यानंतर आता महिलांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न पडत आहे. राज्यातील महिलांना या महिन्यात नवरात्र उत्सवाचा आनंद साजरा करायचा आहे. या सणानिमित्त घरोघरी घटस्थापना केली जाते दहा दिवस हा सोहळा आनंदात पार पडतो. अशावेळी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळाल्यानंतर महिलांच्या आनंदात आणखीन भर पडेल. अनेक महिलांना मोठा दिलासा मिळेल. कारण सणासुदीच्या खर्चासाठी हा हप्ता महत्त्वाचा ठरत आहे.
हे पण वाचा| पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार? जाणून घ्या नवीन अपडेट
त्यामुळे या सणानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होऊ शकतात. मागील काही महिन्याचा अनुभव घेतला तर या योजनेचा हप्ता वेळेवर महिलांना मिळालेला नाही. ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबर मध्ये मिळाला असल्यामुळे सप्टेंबर महिन्याचा हप्ता पुढील महिन्यात मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र मीडिया रिपोर्ट नुसार सप्टेंबर महिन्याचे पैसे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात.
अधिकृत घोषणेची वाट पहा
नवरात्रीच्या सणानिमित्त महिलांच्या खात्यात हा हप्ता जमा झाला तर महिलांचा आनंद डबल होईल. मात्र सरकारने याबाबत अजूनही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे हा हप्ता नेमकं कधी मिळणार हा प्रश्न अजूनही कायम राहणार आहे. मात्र महिलांना अपेक्षा आहे की नवरात्र सणानिमित्त सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळावेत, सरकारने सण सुरू होण्यापूर्वी किंवा दरम्यान महिलांच्या खात्यात पैसे जमा करावे. Ladki Bahin Yojana
गावाकडील महिला असो किंवा शहराकडील महिला असो सर्वांसाठी या योजनेचे 1500 रुपये खूप फायद्याचे ठरत आहेत. या योजनेच्या पैशापासून अनेक महिला स्वतःचा घर खर्च भागवत आहे तर काही महिला मुलांची फीज भरण्यासाठी औषध उपचारासाठी या पैशाचा वापर करत आहेत. त्याचबरोबर एखाद्या सणानिमित्त या योजनेचे पैसे मिळाले तर त्या सणाची खरेदी करण्यासाठी महिलांना या योजनेच्या लाभाचा उपयोग होतो. या योजनेअंतर्गत मिळणारा प्रत्येक लाभ महिलांना आर्थिक बळ देत आहे. मात्र महिलांची एकच अपेक्षा आहे या योजनेचा लाभ योग्य वेळेत मिळावा.

2 thoughts on “लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये?”