मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा 14 वा हप्ता कधी येणार? आली मोठी अपडेट समोर


Ladki Bahin Yojana News| महाराष्ट्रातील महिलांसाठी राबविण्यात येणारी सरकारची महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण(Ladki Bahin Yojana News) योजना लाखो महिलांसाठी दिलासा देणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा केले जातात. घर खर्च, मुलांचं शिक्षण आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी हा निधी महिलांसाठी मोठा आधार बनत आहे. Ladki Bahin Yojana News

सध्या सर्वत्र महिलांमध्ये 14 हप्त्याचे आतुरता लागून राहिली आहे. मागील 13 हप्ते वेळेत वितरित झाले आहेत. मात्र पुढील हप्ता नेमका कधी मिळणार याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मागच्या काही हपत्यांचा वेळ पाहता बहुतांश हप्ते महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जमा झालेले आहेत. त्यामुळे यंदाही सप्टेंबर महिन्यात दुसरा किंवा तिसरा आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या योजनेत कोणतेही माध्यम व मध्यस्थी नाही. रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. त्यामुळे खात्यातील माहिती बरोबर असणं खूप गरजेचे आहे. चुकीचा बँक तपशील असल्यास हप्ता मिळू शकणार नाही. राज्य सरकारने आधीच जिल्हा प्रशासन आणि बँकांना सूचना दिले आहेत आर्थिक विभागाची तयारी सुरू असून 14 वा हप्ता सुरळीत जमा व्हावा यासाठी पावला उचलली जात आहेत.

सणासुदीचे दिवस आणि शाळा घर खर्च यामुळे लाख महिलांच्या नजरा या हप्त्याकडे लागल्या आहेत. सोशल मीडिया द्वारे सुद्धा घोषणा करण्याची मागणी जोर धरत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 12 ते 18 सप्टेंबर 2025 दरम्यान चौदावा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. अधिकृत तारीख सरकारकडून लवकरच जाहीर होईल. त्यामुळे महिलांनी देखील कुठल्याही अफेवर विश्वास ठेवू नये. केवळ सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरती वाचलेली माहिती खरी मानावी.

Leave a Comment

error: Content is protected !!