Ladki Bahin Yojana News : राज्यातील 14 लाख लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार? यामध्ये तुमचे नाव आहे का पहा सविस्तर माहिती


Ladki Bahin Yojana News | राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या लाडक्या बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे जुलै महिन्याच्या हपत्याबाबत. हा हप्ता कधी जमा होणार? असा प्रश्न महिलांमध्ये वारंवार उपस्थित होत आहे. परंतु त्यापूर्वी एक मोठी अपडेट हाती आली असून राज्यातील 14 लाख लाडक्या बहिणींना फक्त ₹500 रुपये मिळणार आहेत. या लाभार्थी पैकी तुम्ही या यादीमध्ये आहात का? तुम्हाला दीड हजार रुपये मिळणार का? पाचशे रुपये मिळणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया. Ladki Bahin Yojana News

कधी नव्हे ते सरकारने लाडकी बहिणींना दरमहा  दीड हजार रुपये देण्याचं वचन दिला आहे आणि कित्येकांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेले आहे. पण निवडणुकीपूर्वी केलेलं वचन अजून पूर्ण झालेलं नाही. आता तर त्यावरती पूर्णपणे पाणी पेरताना पाहायला मिळत आहे.  मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून सुमारे 14 लाख महिलांना आता दीड हजार रुपये नव्हे तर पाचशे रुपयांचाच लाभ मिळणार आहे. कारण त्या महिलांना आधीच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा दोन हजार रुपयांचा लाभ मिळतो, म्हणून दोन्ही मिळून कसे पैसे द्यायचे नाहीत, असं सरकारचा निर्णय झालेला आहे.

पण यातून ज्यांना घर खर्चासाठी, औषधासाठी, लेकरांच्या शाळेसाठी थोडी मदत हवी होती, त्या महिलांच्या अपेक्षांचा भंग झाला आहे. दुसरीकडे तब्बल 40 लाखाहून अधिक महिलांना योजनेतून थेट  पात्र ठरविण्यात आलं. यामध्ये ज्या महिलांकडे चार चाकी गाडी आहे एका घरातून दोन-तीन लाभार्थी, 65 वया गटावरील आजीबाई, सरकारी नोकरी करणाऱ्या महिला, संजय गांधी निराधार लाभार्थी आणि अगदी काही ठिकाणी पुरुष अर्जदार सुद्धा होते, हे उघड झाल आहे.

त्यामुळे हे अर्ज फेटाळण्यात आले. इतकच नाही तर ज्यांचा उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे, अशा महिलांच्या समोर FSC म्हणजे Financially strong असा टॅग लावून त्यांचाही लाभ बंद करण्यात आलेला आहे. सुरुवातीला या योजनेमध्ये तब्बल दोन कोटी 59 लाख अर्ज आले होते, पण नंतर पडताळणी होत गेल्यावर ती संख्या आता 2 कोटी 19 लाखांवर आली आहे. यामुळे सरकारला दर महिन्यांचा खर्च ₹3,800 कोटी पासून थेट ₹3,000 कोटी पर्यंत खाली आणता आला आहे.

एवढं सगळं करून, आता सरकार म्हणतंय योजना प्रामाणिक महिलांपर्यंत पोहोचावी यासाठी ही कारवाई करण्यात आलेली आहे. पण ग्रामीण भागात आजही हजारो महिलांना खात्यावर पैसे आले नाहीत, MMS आले नाहीत आणि पंचायत कार्यालयातून धावपळ सुरू आहे. आता ज्यांचं नाव अपात्र यादीत आलय त्यांनी पुन्हा कागदपत्रांची शहानिशा करून द्यावी, आणि खरंच पात्रे असतील तर त्यांना लाभ पुन्हा सुरू केल्या जाईल असं सरकारने सांगितलं. पण आधी ₹1500 मिळत होतो आता अचानक पाचशे रुपये वर आले, त्याला कुमार यांच्या मनात प्रश्न आहे आम्ही काही चुकलो हो?

(Disclaimer : वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही)

हे पण वाचा | Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट! या तारखेला येणार एप्रिल महिन्याचा हप्ता?

Leave a Comment

error: Content is protected !!