Ladki Bahin Yojana News : राज्य सरकारची लोकप्रिय ठरलेली माझी लाडकी बहीण(mazi Ladki Bahin Yojana) योजनेतून महिलांना मिळणाऱ्या सन्मान निधी योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न वारंवार उपस्थित होत होता. परंतु आता त्या प्रश्नाला पूर्णविराम लागलेला आहे आणि लवकरात महिलांच्या खात्यावरती हा हफ्ता (₹1500 रुपये) जमा होणार आहे. अनेक जनी म्हणत होत्या भाऊ हा हप्ता कधी येणार? काही जणी तर म्हणत होते की रक्षाबंधन येऊन गेलं तरी खात्यात पैसे जमा होणार का? पण आता सरकारकडून एकदम दिलासादायक बातमी आलेली आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वेसनदेला म्हणजे 30 जुलै पासून सन्मान निधीचा ₹1500 रुपयांचा थेट हप्ता खात्यावरती जमा होणार आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती(Aditi Tatkare) तटकरे यांनी दिली आहे. Ladki Bahin Yojana News
सध्या अनेक महिलांनी या योजनेत नोंदणी केली असून काहींचे अर्ज मंजूर झाले, काहींची पडताळणीसाठी थांबले तर काहींचे दुर्दैवाने बाद झाले. मात्र ज्यांचे अर्ज पात्र आहेत, त्यांच्या खात्यावरती दीड हजार रुपये रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी जमा होतील असं मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Twitter) वरून एक पोस्ट करत माहित. “मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी जुलै महिन्याचा सन्मान निधीचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे.”
जुलै महिना संपला तरी बँकेत पैसे आले नाही? दोन महिन्यांचा एकत्रित हप्ता येणार का? की योजनेत काहीतरी अडचण आहे? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. सेल्फी ग्रुपमध्ये, SHG बैठकीत आणि गावामध्ये देखील ऐकायला मिळत होत्या. पण आता सरकारने रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणींसाठी खास आर्थिक भेट देण्याचा निर्णय घेतल्याने महिलांमध्ये एक आनंद निर्माण झालेला आहे. काही महिलांनी तर रक्षाबंधनची खरेदी देखील सुरू केली आहे कोणीतरी साडी घेताय, कुणीतरी काहीतरी खास गिफ्ट घेतय.
या योजनेची पडताळणी प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. अनेक महिलांचे अर्ज निकष पूर्ण न केल्यामुळे बाद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहे, त्यांना यापुढे लाभ मिळणार नाही असेही पष्ट करण्यात आल आहे. काही महिलांनी चुकीची माहिती दिली, काहींनी आर्थिक निकष ओलांडले, तर काहींनी आधार लिंक सारख्या मूलभूत अटी पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे पात्र बहिणींनी आपले आधार लिंक, बँक डिटेल्स आणि मोबाईल क्रमांक व्यवस्थित ठेवावेत, अन्यथा पुढचा हप्ता अडकण्याची शक्यता आहे.
आता तर हे ठरलं की महिलांच्या खात्यात पैसे हे रक्षाबंधना दिवशी येणार आहेत त्यामुळे महिलांमध्ये आनंदाची वाट पसरली आहे तसेच पुढील लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अपडेट साठी आम्हाला फॉलो करत चला.
हे पण वाचा | लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर