Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहिणींना मिळणार नाही ₹1500 रुपये काय आहे कारण जाणून घ्या


Ladki Bahin Yojana News : महाराष्ट्रातील लाखो महिलांची आधार बनलेली लाडकी बहीण (mukhymantri ladki bahin Yojana) योजना ही महिलांची एक आर्थिक आधार बनलेली आहे. आणि याच योजनेतून लाखो महिलांना लाभ देखील मिळाला आहे. आणि यामुळे महिला शासनाच्या खूप मोठ्या आभारी आहेत. ज्यांनी महिलांसाठी हा मोठा उपक्रम राबवत महिलांना मोठा आधार दिलेला आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच महिलांच्या चेहऱ्यावरती एक हास्य निर्माण होतं ते म्हणजे महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा झालेला असा मेसेज आला की, परंतु आता विचार करायच झाल्यास महिलांच्या डोळ्यांमध्ये पाणी देखील येणार आहे. कारण यावेळेस लाडक्या बहिणी योजनेतून अनेक महिलांचे नाव वजा करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार नाही. हे ऐकून अनेक महिलांना वाईट वाटणार आहे हे खरं परंतु कारण काय आहे हे एकदा समजून घेऊया. Ladki Bahin Yojana News

सरकारकडून जुलै महिन्याचा हप्ता वितरित झालेला आहे. आणि आता त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार याची वाट महिलांनी पाहायला सुरुवात केलेली आहे. या महिन्यात पैसे कधी येणार? असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे. पण अचानक बातमी आली की या योजनेमधून जवळपास 42 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. यामध्ये 26 लाख महिला थेट अपात्र ठरले आहेत. स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली असून. अजूनही अनेक अर्जांची पडताळणी सुरू आहे यामुळे अजून काही महिलांना या योजनेतून बाहेर केलं जाऊ शकत अशी भीती व्यक्त केली जात आहे.

हे पण वाचा| या लाडक्या बहि‍णींना ऑगस्ट महिन्याचे ‌₹1500 मिळणार नाहीत; नेमकं काय कारण? जाणून घ्या सविस्तर

हप्ता का मिळणार नाही ?

लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवताना काही ठोस कारणा सांगितलेले आहेत ते एकदा समजून घ्या.

  • लाभार्थी महिला वयाच्या 21 ते 65 वयोगटात असल्यास त्यांना लाभ मिळणार.
  • कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असावं.
    -ज्यांच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
  • कर दाते कुटुंब या योजनेतून बाहेर ठेवण्यात आलेले आहेत.

या योजनेत लाभ घ्यायला सुरुवातिला मोठ्या प्रमाणावर अर्ज आले. जवळपास अडीच कोटी महिलांनी नोंदणी केली होती. पण निकषात बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ सुरू ठेवण्याचा सरकारचा हेतू आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांतर्गत महिलांच्या अर्जाची पडताळणी करत आहेत. जर कोणी चुकीची माहिती देऊन योजना सुरू ठेवली असेल तर त्या महिलांना पैसे मिळणार नाही आणि त्यांचे ताबडतोब पैसे थांबवण्यात येतील. Ladki Bahin Yojana News

सरकारचा इशारा

महसूल आणि महिला बालकल्याण विभागाने पष्ट केला आहे की, ज्या महिलांनी निकषात बसणार नाहीत, त्यांना अजिबात पैसे मिळणार नाही. यामुळे अनेकजणांच्या चेहऱ्यावरती एक निराशा तयार झालेले आहे तर अनेक महिलांचे नाव यादी मधून काढण्यात आलेले आहेत. आता उरलेल्या अर्जांची पडताळणी पूर्ण झाली की आणखी नावे कमी होणार हे शक्यता नाकारता येणार नाही. आता पुढे काय होते हे पाहण्यासारखे राहणार आहे.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहिणींना मिळणार नाही ₹1500 रुपये काय आहे कारण जाणून घ्या”

Leave a Comment

error: Content is protected !!