‘लाडकी बहीण’ योजनेची e-KYC करताना OTP येत नाही? ही सोपी पद्धत वापरा आणि केवायसी पूर्ण करा

Ladki Bahin Yojana: राज्यातील लाखो महिलांसाठी लाडकी बहीण योजना वरदान ठरली आहे. ही योजना पुन्हा एकदा आता चर्चेचा विषय बनली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आलेली योजना मागील वर्षभर प्रत्येक महिलांच्या संसाराला आर्थिक आधार देत होती. या योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ महिलांच्या खात्यात थेट महाडिबीटी द्वारे जमा केला जात आहे. या लाभातून अनेक महिला आपले कुटुंब चालवत आहेत. दरम्यान सरकारने यामध्ये पारदर्शकता निर्माण व्हावी यासाठी ई–केवायसी करणे अनिवार्य केले आहे. मात्र पोर्टलवर ई–केवायसी करण्यासाठी गेल्यानंतर साईट चालत नसल्यामुळे ओटीपी प्राप्त होत नाही. या अडचणीला अनेक महिला कंटाळल्या आहेत.

लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

ई–केवायसी करताना निर्माण होणाऱ्या अडचणी

सरकारने अचानक लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी अनिवार्य केल्यानंतर गावोगावी केंद्रावर गर्दी दिसू लागली आहे. एखादी महिला ई–केवायसी करायला जाते आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर बराच वेळ मोबाईलकडे पहावं लागतं पण ओटीपी मात्र येत नाही. काही वेळा इंटरनेट नीट चालत नाही तर काही वेळा आदर्श जोडलेले नंबर जुना असल्यामुळे महिलांना या प्रक्रियेसाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे. पोर्टलवरून ओटीपी प्राप्त होत नसल्यामुळे दिवसभर शेतीत काम करून आलेल्या महिला या गोष्टीला कंटाळल्या आहेत. Ladki Bahin Yojana

ही सोपी पद्धत वापरा

तुम्हाला देखील अशीच समस्या निर्माण होत असेल तर घाबरू नका. खालील काही सोप्या पद्धती वापरून तुम्हीही अडचण दूर करू शकता.

  • सर्वप्रथम इंटरनेट चालू आहे का नाही तपासा?—कधीकधी ओटीपी न येण्यामागे इंटरनेट समस्या देखील असू शकते. दुसऱ्या ठिकाणी जाऊन पुन्हा प्रयत्न करा.
  • बँक खाते व आधार क्रमांक लिंक आहे का नाही? चेक करा— तुमचे बँक खाते आधार क्रमांक अशी जोडलेले नसेल किंवा माहिती चुकीची असेल तर अडचण निर्माण होऊ शकते.
  • अर्ज मंजूर झालेला आहे का नाही? तपासा— लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झालेला आहे का नाही हे तपासून घ्या.
  • प्रशासनाशी संपर्क साधा —सर्व प्रयत्न करूनही ओटीपी मिळत नसेल तर जवळील जिल्हा प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधा.

हे पण वाचा| गुड न्यूज! सोनं झालं तब्बल 3,200 रुपयांनी स्वस्त; वाचा आजचे नवीन दर

E–kyc कशी करावी?

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे ई–केवायसी प्रक्रिया खालील प्रमाणे करू शकता.

  • सर्वप्रथम वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • तिथे दिसणाऱ्या ई–केवायसी बॅनर वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका आणि कॅप्चर कोड टाकून सेंड ओटीपी या बटणावर क्लिक करा.
  • आधार सोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी प्राप्त होईल तो त्या ठिकाणी टाका आणि सबमिट करा.

लाडकी बहीण योजनेची ई–केवायसी करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. फक्त सरकारने पोर्टलवर येणाऱ्या समस्या लवकरात लवकर दुरुस्त करून द्याव्यात. लाडकी बहिणी योजना ही केवळ 1500 रुपये मदत देणारी योजना नसून अनेक महिलांना दिलासा व आत्मविश्वास देणारी योजना आहे. म्हणूनच ही प्रक्रिया थोडी किचकट असली तरी संयमाने पूर्ण करा. सरकारी महिलांना त्रास न देता ही सर्व प्रक्रिया सुरळीत होईल यासाठी प्रयत्न करत आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “‘लाडकी बहीण’ योजनेची e-KYC करताना OTP येत नाही? ही सोपी पद्धत वापरा आणि केवायसी पूर्ण करा”

Leave a Comment

error: Content is protected !!