Ladki Bahin Yojana Scheme: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत नुकताच जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. रक्षाबंधनाच्या निमित्त साधून राज्य सरकारने या योजनेचा हप्ता लाडक्या बहिणींना गिफ्ट म्हणून दिला आहे. मात्र अनेक महिलांना या योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. लाडकी बहीण योजनेतील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. पण आता अनेक महिलांना तेरावा हप्ता मिळालेला नाही. त्यामागे काय कारण असू शकते? याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. Ladki Bahin Yojana Scheme
हे पण वाचा| लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती..
जुलै महिन्याचा हप्ता न मिळण्याची कारणे
- लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरील रहिवाशा असून या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता मिळणार नाही.
- लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी 21 ते 65 वयोगटातील महिला पात्र आहेत. या वयोगटापेक्षा जास्त वयाच्या महिलांना या योजनेचा लाभ बंद करण्यात आला आहे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे. जर तुमचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.
- जर महिला इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- राजकीय कुटुंबातील सध्याचे किंवा माजी आमदार, खासदार असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
- जर कुटुंबात चार चाकी वाहन असेल तर त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. यामध्ये ट्रॅक्टरचा समावेश नाही.
वरीलपैकी कोणत्याही एखाद्या कारणामुळे तुमचा लाडके वहिनी योजनेचा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
रक्षाबंधनाच्या सणानिमित्त लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला आहे. मात्र त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे. ऑगस्टच्या शेवटच्या दोन आठवड्यात किंवा सणासुदीच्या दिवशी हा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु याबाबत सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा किंवा माहिती दिली नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांनी सरकारच्या अधिकृत घोषणेची वाट पाहावी.
1 thought on “लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे 1500 रुपये न मिळण्याची काय कारणे आहेत? जाणून घ्या सविस्तर”