Ladki Bahin Yojana Scheme: लाडकी बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सप्टेंबर महिना सुरू झाला आहे गणेशोत्सवाचा सण सर्वत्र साजरा केला जात आहे. पण अजूनही लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये मिळालेले नाहीत. रोज बँकेत जाऊन पैसे आले आहेत का नाही तपासणाऱ्या महिलांच्या हाती कायम नैराश्याच्या लागत आहे. राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना हप्ता कधी येणार हा प्रश्न पडला आहे. सध्या राज्यात गणेशोत्सवाचा सण सुरू आहे या सणानिमित्त महिलांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम सरकार करू शकते. या लेखामध्ये आपण लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्यात हप्ता कधी मिळणार याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्यामध्ये मिळाला होता त्यामुळे आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबर महिन्यात मिळणार अशी अपेक्षा आहे. दरम्यान सप्टेंबर महिन्यामध्ये फक्त ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार का सप्टेंबरचा देखील त्यासोबतच दिला जाणारा असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. असं असलं तरी आधी ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळेल हाच प्रश्न प्रथम येतो. सरकारकडून आधी अशी चर्चा होती की गणेश उत्सवाच्या निमित्त ऑगस्ट महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होईल. मात्र तसं न झाल्यामुळे अनेक महिलांना आता गौरीपूजनाच्या निमित्त देखील हप्ता मिळण्याची शक्यता वाटत आहे. मात्र सरकारकडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसांमध्ये सरकार काय भूमिका घेत आहे हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
हे पण वाचा| महत्त्वाची बातमी! लाडक्या बहिणींनो ‘हे’ काम करा, अन्यथा मिळणार नाहीत ₹1500
एकत्रित तीन हजार मिळणार का?
ऑगस्ट महिन्याचा हप्ता या महिन्यातच लवकरच महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. अशा सप्टेंबर महिना सुरू झाल्यामुळे महिलांच्या मनात आता नवा प्रश्न निर्माण झाला आहे. ऑगस्ट चा हप्ता या महिन्यात मिळणार असल्यामुळे सप्टेंबरचा आणि ऑगस्ट चा असे दोन्ही फक्त एकत्रित दिले जातील का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जर सरकारने खरंच दोन महिन्याचे पैसे एकत्रित दिले तर महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल. पण याबाबत सरकारने अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही त्यामुळे महिलांनी फसव्या बातम्या पासून सावध राहावे. Ladki Bahin Yojana Scheme
दरम्यान राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे या काही दिवसापूर्वी यासंदर्भात घोषणा करतील अशी शक्यता आहे. त्यामुळे महिलांनी अजूनही काही दिवस ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणे आवश्यक ठरणार आहे. या योजनेची पडताळणी सुरू असल्यामुळे या योजनेतून अनेक महिला दर महिन्यात अपात्र होत आहेत. या महिन्यात देखील काही महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला नाही तर त्या महिला देखील या योजनेतून अपात्र झाल्या आहेत असे समजावे. जर तुम्ही निकषाचे पालन करीत नसाल तर या योजनेतून बाद केले जाल.
लाडकी बहीण योजना ही फक्त पैसे देणारी योजना नसून अनेक महिलांचे घर चालवण्यासाठी त्यांच्या मुलांचे शिक्षण करण्यासाठी छोट्या-मोठ्या खर्चासाठी मोठा आधार देणारी ही योजना ठरत आहे. आज किंवा उद्या या योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाल्यानंतर अनेक महिलांच्या घरातील राशन या पैशातून घेतले जाणार आहे. अनेक गोरगरीब महिलांच्या चेहऱ्यावर या योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर आनंद दिसतो. त्यामुळे हा हप्ता वेळेवर मिळणं खूप महत्त्वाचा आहे. आता सरकारकडून अधिकृत घोषणा कधी होईल याकडेच लाडक्या बहिणींची नजर आहे.