Ladki Bahin Yojana Scheme: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सध्या प्रसार माध्यमांमध्ये लाडक्या बहिणींना दोन महिन्याचे पैसे एकत्रित मिळणार असल्याची बातमी मोठी चर्चेत आहे. लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता अजून मिळाला नाही त्यामुळे महिलांमध्ये गोंधळ उडाला आहे. आता जून आणि जुलै असे दोन महिन्याचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना एकत्र मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री लाडके बहीण सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही योजना सुरू झाल्यापासून नियमितपणे त्या महिन्याचा हप्ता जमा होत आहे. मात्र जून 2025 चा हप्ता अजूनही महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. आज 27 जून 2025 असून जून महिना संपायला अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. या उशिरामुळे महिलांमध्ये चिंताचे वातावरण निर्माण झाले आहे. Ladki Bahin Yojana Scheme
हे पण वाचा| वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रात प्रथमच पुढील पाच वर्षासाठी वीजदर कमी होणार
दरम्यान प्रसार माध्यमांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे की, जून आणि जुलै चा हप्ता एकत्रित जमा होणार यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लाडक्या बहिणींना खरंच तीन हजार रुपये एका वेळी मिळणार का? कधीपर्यंत पैसे जमा होतील? अशा अनेक प्रश्नांनी लाडक्या बहिणींच्या मनात घर केला आहे. दरम्यान या प्रश्नाचे उत्तरे सरकारकडून अधिकृतपणे सांगण्याची प्रतीक्षा आहे. जर दोन महिन्याचे पैसे एकत्रित महिलांना दिले तर महिलांना मोठा आर्थिक आधार मिळण्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण योजनेच्या इतिहासात असा प्रसंग यापूर्वीही घडला आहे. जेव्हा दोन महिन्याचे पैसे एकाच वेळी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते. मे चा हप्ता हा थोड्या विलंबामुळे म्हणजेच जून महिन्याचा पहिल्या आठवड्यात जमा झाला होता यामुळे आता जून चा हप्ता आणि त्यानंतर येणारा जुलै चा हप्ता असे दोन हप्ते एकत्रित मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता जून आणि जुलै अशा दोन हप्त्याचे तीन हजार रुपये एकत्रित मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील अनुभवानुसार ही शक्यता नाकारता येत नाही परंतु सरकारने यावर तातडीने स्पष्टीकरण देणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हे पण वाचा| बियाणांपासून ते ट्रॅक्टरपर्यंत! शेतकऱ्यांना पंचायत समितीकडून मिळणार विविध योजनांचा लाभ, असा करा अर्ज..
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी यापूर्वी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत स्वतः घोषणा केल्या होत्या. त्यामुळे राज्यातील लाभार्थी महिलांचे लक्ष सध्या अधिकृत घोषणे संबंधित हप्त्याच्या रकमेची माहिती घेण्याकडे आहे. मात्र जून च्या हप्त्याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती किंवा घोषणासमोर आलेली नाही. जून महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना सरकारकडून लवकरात लवकर याबाबत माहिती जाहीर करणे अपेक्षित आहे. लाडक्या बहिणींना दोन महिन्याचे एकत्रित पैसे मिळणार का जून महिन्याचे पैसे जुलैमध्ये मिळणार अशा अनेक प्रश्न पडले आहेत.
लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये सुरू झाली आणि तेव्हापासून आतापर्यंत पात्र महिलांना एकूण 11 हप्ते नियमितपणे मिळाले आहेत. जुलै 2024 ते मे 2025 या कालावधीतील प्रत्येक महिन्याचा हप्ता वेळेवर महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे. या योजनेने राज्यातील लाखो महिलांना मोठा आर्थिक आधार दिला असून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची काम केले आहे. अनेक कुटुंबांसाठी 1500 रुपयाची मासिक रक्कम जीवन जगण्याचा आधार बनली आहे. मे महिन्याचा हप्ता जूनच्या सुरुवातीला जमा झाला असला तरी जूनच्या हप्त्याला विलंब महिलांना प्रश्नात टाकत आहे.
हे पण वाचा| मोठी बातमी! PM किसान योजनेचा 20व्या हप्त्याला उशीर होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर..
जून जुलै महिन्याच्या हप्ता एकत्रित मिळणार का?
जून महिना आता संपत आला आहे आणि या महिन्याचा हप्ता अजून जमा झाला नाही अशा परिस्थितीत केवळ तीन दिवसात जूनचा हप्ता स्वातंत्रपणे जमा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे जून आणि जुलै चे असे दोन महिन्याचे पैसे एकत्रित तीन हजार रुपये जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता जास्त आहे. यापूर्वीही असे घडले असल्यामुळे ही शक्यता नाकारता येणार नाही. मात्र जोपर्यंत सरकारकडून अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत कोणताही संभ्रम ठेवू नका. यावर लवकरात लवकर स्पष्टता यावी अशी महिलांची मागणी आहे.
लाडकी बहीण योजना ही खऱ्या अर्थाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोलाची भूमिका बजावत आहे. दर महा मिळणारे 1500 रुपयाची रक्कम अनेक महिलांच्या कुटुंबाला मोठा आधार देत आहे. त्यामुळे हप्त्यामध्ये होणारा विलंब महिलांच्या सहशीलतेच्या बाहेर आहे. सरकारने यावर तातडीने लक्ष घालून याबाबत स्पष्टता आणावी आणि हप्ता नियमितपणे जमा करावेत अशी अपेक्षा आहे. जर जून आणि जुलै चे हप्ते एकत्रित म्हणजेच 3000 रुपये महिलांना एकत्रित मिळाले तर महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल. आणि त्यांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर होईल.
आता सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या नजरा सरकार आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या घोषणाकडे लागल्या आहेत. महिलांना तीन हजार रुपयांचा डबल हप्ता खरंच मिळणार का हे लवकरच स्पष्ट होईल तोपर्यंत सर्व लाभार्थी महिलांनी धीर धरणे महत्त्वाचे ठरणार आहे.
2 thoughts on “लाडक्या बहिणींना 3,000 रुपये एकाचवेळी मिळणार? महिलांच्या खात्यात जमा होणार डबल हप्ता?”