Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहिणींना मिळणार नाही ऑगस्ट-सप्टेंबर हप्त्याचे ₹3,000, कारण काय? वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही राज्यातील महिलांसाठी आर्थिक आधार ठरली आहे. या योजनेमुळे लाखो महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. पण गेल्या काही दिवसापासून या योजनेच्या हप्त्याबाबत अनेक शंका आणि संभ्रम महिलांच्या मनात निर्माण झाले आहेत. सप्टेंबर महिना सुरू झाला असून देखील अजूनही ऑगस्ट महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे आता ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्रित मिळणार का? असा प्रश्न महिलांसमोर उपस्थित झाला आहे. त्याचबरोबर काही महिलांना ऑगस्ट–सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणारच नाही असे देखील म्हटले जात आहे.

कोणाला मिळणार नाही हप्ता?

लाडकी वहिनी योजनेत सरकारने ठराविक निकष ठरवले होते. त्या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात अशाही महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे ज्या या नियमाचे व अटी चे पालन करत नाहीत. या महिलांचे अर्ज तपासले असता त्यांनी खोटी माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा महिलांना आता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार नाही असे सांगितले जात आहे.

26 लाख महिलांची पडताळणी सुरू

स्वतः राज्यातील महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, सुमारे 26 लाख महिलांचे पुन्हा पडताळणी केली जात आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन या महिलांची माहिती गोळा करून ही माहिती योग्य आहे की अयोग्य याची पडताळणी करत आहे.

हे पण वाचा| लाडक्या बहिणींना आता एकत्रित ₹3,000 मिळणार? ऑगस्ट-सप्टेंबर हप्त्याबाबत मोठी अपडेट्स आली समोर

पडताळणी कशी केली जाते?

  • एका घरातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत? हे तपासलं जात आहे. कारण या योजनेअंतर्गत एका घरातील फक्त दोनच महिलांना लाभ दिला जातो.
  • कुटुंबातील कोणताही सदस्य इन्कम टॅक्स भरतो आहे का? हे देखील तपासले जात आहे कारण ज्या कुटुंबातील कोणीही इन्कम टॅक्स भरत असेल त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ दिला जात नाही.
  • वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे का? ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जात नाही.
  • पात्रता प्रमाणपत्रांमध्ये दिलेली माहिती खरी आहे का? अर्ज भरताना महिलांनी पात्रता निकषातील सर्व माहिती खरी दिली का खोटी याची देखील पडताळणी केली जात आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत होत असणाऱ्या पडताळणीमुळे ग्रामीण भागातील महिलांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. पडताळणीमध्ये आमचा अर्ज या योजनेतून बाद होतो की काय असा प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित होत आहे. अनेक महिलांनी या योजनेत नोंदणी केली होती. काहींना पैसे वेळेवर मिळाले तर काहींच्या खात्यात अजूनही हप्ता आलेले नाहीत. त्यामुळे अनेक महिलांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. विशेष म्हणजे अनेक घरातील महिलांनी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेतला आहे. Ladki Bahin Yojana

सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, पात्र महिलांना कोणत्याही परिस्थितीत योजनेचा लाभ मिळत राहणार आहे. मात्र निकषा बाहेरून या योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या महिलांनी प्रामाणिकपणे निकषाचे पालन करून अर्ज केला आहे त्यांना काळजी करायची गरज नाही. सप्टेंबर महिना संपते पर्यंत या योजनेची पडताळणी पूर्ण होऊन योग्य लाभार्थ्यांना दोन्ही महिन्याचे पैसे दिले जातील.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

2 thoughts on “Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहिणींना मिळणार नाही ऑगस्ट-सप्टेंबर हप्त्याचे ₹3,000, कारण काय? वाचा सविस्तर”

Leave a Comment

error: Content is protected !!