Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींना ऑगस्ट महिन्याचे ‌₹1500 मिळणार नाहीत; नेमकं काय कारण? जाणून घ्या सविस्तर


Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 1500 रुपयांचा आर्थिक आधार सरकारकडून देण्यात आला आहे. आता सगळ्यांच्या नजरा ऑगस्ट महिन्याच्या 1500 रुपयाकडे आहेत. ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार हा प्रश्न महिलांच्या वतीने वारंवार विचारला जात आहे. दरम्यान एक महत्त्वाची अपडेट समोर आले आहे यामध्ये सर्वच लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार असे नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल का नाही मिळणार? आणि आपला आता चालू ठेवण्यासाठी काय कराव लागेल? याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू

लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात अर्ज असल्यामुळे या योजनेची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. पडताळणी मध्ये ज्या महिला या योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत त्या महिलांना या योजनेतून अपात्र केले जात आहे. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार सुमारे 42 लाख अर्ज बात करण्यात आले असून त्यापैकी 26 लाख महिला अपात्र ठरवल्या गेल्या आहेत अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. अजूनही जिल्हा पातळीवर पडताळणी सुरू आहे म्हणून कागदपत्र पडताळणी दरम्यान निकषा बाहेर असणाऱ्यांना महिला आढळून आल्यास ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार नाही.

हे पण वाचा| रोज फक्त 50 रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल 35 लाख रुपये; काय आहे योजना? जाणून घ्या सविस्तर माहिती

कोणत्या लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही?

  • वयोमर्यादा: लाभार्थी 21 ते 65 वयोगटात असणे बंधनकारक आहे. जर लाभार्थी महिला 21 ते 65 वयोगटात नसेल तर त्या महिलांना अपात्र ठरवले जाणार आहे.
  • उत्पन्न निकष: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी कुटुंबीयांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयापर्यंत असणे गरजेचे आहे. जर 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • सरकारी नोकरी: लाभार्थी महिला सरकारी कर्मचारी नसावी. जर लाभार्थी महिला सरकारी कर्मचारी असेल तर त्या महिलांना देखील अपात्र केले जाणार आहे.
  • चार चाकी वाहन: जर लाभार्थी महिलांच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन असेल तर त्या महिलांना देखील या योजनेतून अपात्र केले जाणार आहे.
  • आयकरदाते: लाभार्थी कुटुंबातील सदस्य आयकर भरणारा नसावा. कुटुंबातील एखादा सदस्य आयकर भरत असेल तर त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही.

दरम्यान या योजनेअंतर्गत वरील निकषाच्या बाहेर कोणतीही माहिती लपवून किंवा चुकीची देऊन लाभ घेत असल्यास त्या महिलांना या योजनेअंतर्गत अपात्र केले जात आहे. अंगणवाडी सेविका स्थानिक पथक घरोघरी जाऊन या योजनेतील पडताळणी करत आहे. कागदपत्रात विरोधाभास आढळला तर पुढचा हप्ता मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. Ladki Bahin Yojana

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

error: Content is protected !!