Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींना मिळणार नाही जुलै महिन्याचे 1500 रुपये; अपात्रतेचे कारण काय? जाणून घ्या सविस्तर


Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर महिलांच्या खात्यात नऊ ऑगस्ट रोजी जुलै महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे. या दिवशी प्रत्येक पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा केले जाणार आहेत. हा हप्ता जमवण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र यात एक मोठी अडचण समोर आली आहे. जुलै महिन्याचा हफ्ता जमा होण्या अगोदरच सुमारे 42 लाख महिलांना या योजनेतून अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी जुलै महिन्याचे गिफ्ट मिळणार नाही. शासनाने केलेल्या पडताळणी मध्ये या महिलांनी योजनेच्या निकषाचे पालन न केल्यामुळे त्यांना या योजनेतून अपात्र करण्यात आले आहे.

अपात्र करण्याचे प्रमुख कारणे

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने काही नियम आणि अटी ठेवल्या होत्या. ज्यांची माहिती न घेता अनेक महिलांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केले आहेत. या योजनेतून अपात्र ठरविण्यात आलेल्या महिलांची काही प्रमुख कारणे खालील प्रमाणे आहेत. Ladki Bahin Yojana

हे पण वाचा| लाडकी बहीण योजनेच्या जुलैच्या हप्त्याची तारीख ठरली! पण ऑगस्टचे ₹1500 कधी मिळणार?

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. या वयोमर्यादा बाहेरच्या अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता त्यामुळे आता या महिला अपात्र झाल्या आहेत.
  • योजनेसाठी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे. मात्र अनेक महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असूनही या योजनेचा लाभ घेतला आहे त्यामुळे त्या महिला देखील अपात्र करण्यात आल्या आहेत.
  • ज्या महिला आधीपासूनच इतर सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना या योजनेतून बाद करण्यात आले आहे.
  • आयकर भरणाऱ्या आणि चार चाकी वाहन चालवणाऱ्या महिलांना या योजनेतून लाभ दिला जात नाही अशाही महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात आले आहे.

अनेक महिलांना या नियमाची माहिती असूनही त्यांनी या योजनेला अर्ज केले होते. आता शासनाच्या पडताळणीमध्ये या चुका समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा महिलांना या योजनेतून बाहेर काढण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे तुम्ही या योजनेचा चुकीचा पद्धतीने लाभ घेतला असेल तर तुमचे नाव देखील अपात्र यादीत येऊ शकते. तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहात का नाही हे तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन तपासू शकता. जर तुम्ही वरील निकषांमध्ये बसत असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी 1500 रुपयांचे गिफ्ट जमा होईल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

2 thoughts on “Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींना मिळणार नाही जुलै महिन्याचे 1500 रुपये; अपात्रतेचे कारण काय? जाणून घ्या सविस्तर”

Leave a Comment

error: Content is protected !!