Ladki Bahin Yojana Update : महिलांनो, जर तुम्ही देखील राज्य शासनाच्या लोकप्रिय लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी असाल तरी ही बातमी नक्की वाचा. कारण, तुम्हाला या योजनेतून घेतलेला लाभ परत करावा लागू शकतो? जर हे निकष पाळले नाही तर. काय आहेत नवीन निकष आणि शासनाने काय मोठा नवीन निर्णय घेतला? हे एकदा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया त्यासाठी हा लेख सविस्तर वाचा. Ladki Bahin Yojana Update
या लाडकी बहिणी योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना पंधराशे रुपये मिळाले आहेत. ही योजना आता भलतीकडेच वळली आहे. जेव्हा सरकार या योजनेची घोषणा करत होतं, तेव्हा ग्रामीण भागातल्या अनेक महिलांना मोठा दिलासा मिळाला होता. त्यामुळे महिलांना स्वतःचा एक स्त्रोत निर्माण झालं होतं. महिन्याच्या महिन्याला खात्यात पैसे येणार या कल्पनेने गावातील अनेक महिलांच्या चेहऱ्यावरती हसू आलं होतं. पण काही लोकांनी या योजनेचा गैरफायदा घेत असल्याचा उघडकीस आल आहे. त्यामुळे सरकारने घरोघरी जाऊन तपासणी करणार असल्याचे म्हटल आहे.
जालना जिल्ह्यातील जवळपास 70000 महिलांची नाव सध्या छाननीसाठी निवडण्यात आली आहेत. अंगणवाडी सेविकांना आदेश देण्यात आलेले असून, प्रत्येक लाभार्थ्यांच्या घरी जाऊन पडताळणी करण्याचे काम सध्या सुरू आहे. एकाच घरातून अनेक महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यामुळे या योजनेच्या मूळ उद्देशावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. Ladki Bahin Yojana Update
हे पण वाचा| या लाडक्या बहिणींना मिळणार नाही जुलै महिन्याचे 1500 रुपये; अपात्रतेचे कारण काय? जाणून घ्या सविस्तर
अधिक धक्कादायक बाब म्हणजे, काही ठिकाणी पुरुषांनीच महिलांच्या नावावरती अर्ज भरून महिन्याला पंधराशे रुपये उचलल्याचे समोर आला आहे. असे जवळपास 14 हजाराहून अधिक पुरुषांनी या योजनेचा गैरफायदा घेतल्याचे स्पष्ट झाल आहे. त्यांच्या खात्यात जवळपास दहा महिन्यापर्यंत पैसे जमा झाले होते. अंदाजे 21 कोटी रुपयांहून अधिक रक्कम अशा खात्यांमध्ये जमा झाल्याचे समोर आल आहे.
यासोबतच काही शासकीय महिला कर्मचाऱ्यांना देखील या योजनेचा लाभ घेतला आहे. ज्यांना आधी वेतन मिळतं. तपासात आढळून आला आहे की तब्बल 2000 हून अधिक सरकारी कर्मचारी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. एकूण एक लाख 60 हजार पेक्षा अधिक सहकारी कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली होती.
ही योजना निवडणुकीपूर्वी फार गाजावाजा करत होती. महायुती सरकारने महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी हा उपक्रम सुरू केला जवळपास राज्यातील अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये 21 ते 65 व या गटातील महिलांना दर महिन्याला थेट खात्यामध्ये पैसे दिले जातात. पण सुरुवातीच्या काळात निकष फारसे न तपासता अर्ज स्वीकारण्यात आले होते. यामुळे जालना, छत्रपती संभाजी नगर, बुलढाणा, बीड, लातूर यासारख्या भागात एकाच कुटुंबातील दोन, तीन, चार महिलांनी सोबत लाभ घेतला. परंतु आता जर या महिलांना योजनेतून काढून टाकायचा म्हटले तर त्यांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. आणि भीती निर्माण झाली आहे.
त्यामुळे सरकारला देखील मोठा आर्थिक ताण सहन करावा लागतोय. त्यामुळे सरकारने आता नियम कडक केले असून, त्यामुळे ज्या महिलांनी नियमा बाहेर लाभ घेतला आहे, त्यांचे नाव थेट योजनेतून काढण्यात येणार आहे.
या योजनेमुळे गरीब कुटुंबातील महिलांना मोठा आर्थिक हातभार लागला होता एवढं खरं परंतु या योजनेमध्ये अनेक गैरप्रकार झाल्याचा समोर आलेला आहे. काहींनी तर एकच अकाउंट चार-पाच महिलांच्या खात्यावरती लिंक करून ठेवले आणि पैसे उचलले तर काहींनी महिलांचे नावे पुरुषांनी अर्ज भरून पैसे उचलले. त्यामुळे गरीब कुटुंबांना लाभ मिळणे लांबच परंतु चोरट्यांचा बाजार निर्माण झाला आहे. यापुढे सरकार कोणता ठोस निर्णय घेते पाहण्यासारखे राहणार आहे.
1 thought on “लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय? आता या लाभार्थ्यांची घरोघरी जाऊन होणार पडताळणी”