Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासा देणारी ठरत आहे. प्रत्येक महिन्याला मिळणारे 1500 रुपये घर खर्च भागवण्यासाठी आर्थिक आधार बनत होते. मात्र निवडणूक संपतात या योजनेने वेगळे वळण धारण केल्याचे दिसत आहे. राज्यातील अनेक महिलांना हक्काचा लाभ असून देखील अचानक थांबला आहे. त्यामुळे राज्यातील महिला आता संतापलेल्या आहेत. निवडणुका होईपर्यंत दान दिल्यासारखा लाभ वाटला पण आता आम्ही लाडक्या बहिणी सावत्र बहिणी झालोत का? असा सवाल महिलांच्या वतीने उपस्थित केला जात आहे.
निकषाचे पालन करूनही योजनेचा लाभ बंद
दरम्यान महिलांकडून आम्ही सर्व निकषाचे पालन करत असून देखील आम्हाला या योजनेतून वगळण्यात आले आहे असे सांगितले जात आहे. आमच्या घरी गाडी नाही मोठं वाहन नाही कुठलाही सरकारी नोकर धारक नाही सरकारच्या सर्व निकषांमध्ये आम्ही एकदम व्यवस्थित बसतोत. मात्र तरी देखील आमच्या हातात लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत नाही. हा कुठला न्याय आहे? सरकारने निकषाचे पालन न करणाऱ्या महिलांनाच या योजनेतून वगळावे अशी विनंती देखील महिलांच्या वतीने केली जात आहे. अनेक महिलांना या योजनेतून वगळल्या जात आहे त्या महिला या योजनेतून का वगळल्या गेल्या हे देखील सांगितलं जात नाही. त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
E–kyc फायद्याची का तोट्याची?
सरकारने नुकताच लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी सुरू केली आहे. पण प्रत्यक्षात ही प्रक्रिया महिलांसाठी फायद्याचे ठरणार की डोकेदुखी ठरणार हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. ई केवायसी केल्यानंतर योग्य लाभार्थी पर्यंत लाभ मिळेल हे जरी खरं असलं तरी ई केवायसी करण्याची प्रक्रिया करणे अवघड जात आहे.
- आधार क्रमांक टाकला की ओटीपीच प्राप्त होत नाही.
- ओटीपी आला तर टाईम आउट होतो.
- मोबाईलवर आलेला ओटीपी टाकण्यासाठी पर्यायच दिसत नाही.
वरील समस्या ई केवायसी करण्यासाठी उपस्थित होत आहेत. यामुळे लाखो लाभार्थी महिला कागदपत्र घेऊन हेलपटा मारताना दिसत आहेत. मात्र यातून काहीच पदरी पडत नसल्याचे दिसत आहे. Ladki Bahin Yojana
हे पण वाचा| आज पासून GST चे नवीन दर लागू! आता काय स्वस्त अन् काय महाग? जाणून घ्या सविस्तर..
E–kyc प्रक्रिया कशी आहे?
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेल्या प्रमाणे e–kyc करण्याची पद्धत खालील प्रमाणे आहे.
- सर्वप्रथम लाडकी बहिण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागत आहे.
- त्यानंतर दिलेल्या e–kyc बॅनरवर क्लिक करून आधार क्रमांक टाकावा लागत आहे.
- त्यानंतर कॅप्चर कोड टाकून सेंड ओटीपी केल्यानंतर लाभार्थ्यांच्या मोबाईलवर ओटीपी प्राप्त होतो.
- ओटीपी टाकून सबमिट केल्यानंतर तुमची केवायसी झालेली आहे का नाही तपासली जाते.
- जर केवायसी झालेली नसेल तर पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांक विचारला जातो.
- पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकून ओटीपी भरून पुढे जावे.
- यानंतर जात प्रवर्ग निवडून काही अटी मान्य कराव्या लागतात. यामध्ये घरात कोण सरकारी नोकरीत नाही, निवृत्तीवेतन घेणारे नाहीत, कुटुंबातील फक्त एका विवाहित आणि एका अविवाहित व्यक्तीलाच लाभ मिळतो.
वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर success तुमची ई केवायसी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असा संदेश मिळतो.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपयांचा दिला जाणारा लाभ वेळेत महिलांच्या खात्यात जमा केला जात नाही. त्यात अनेक महिला या योजनेतून दर महिन्याला वगळल्या जातात. निकषाचे पालन करून देखील या योजनेतून अपात्र केले जात आहे. यामुळे महिलांच्या मनात आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शासनाच्या सगळ्या अटी आम्ही पूर्ण करतो तरी लाभ बंद का होतो? निवडणुकीनंतर सरकार आम्हाला विसरलं का? असे सवाल महिलांच्या वतीने उपस्थित केले जात आहेत.
लाडकी बहीण योजनेचा लाभ थांबला असल्यास काय करावे?
अनेक महिलांचा लाभ बंद झाल्यामुळे महिलांच्या वतीने एकच प्रश्न उपस्थित केला जात आहे. निकशाचे पालन करून देखील आमचा लाभ थांबवला आहे तर आता आम्ही पुन्हा चालू करण्यासाठी काय करावे.
- सर्वप्रथम तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का ते तपासावे.
- बँक खाते आधार क्रमांकशी लिंक आहे का ते देखील तपासावे.
- आधार कार्ड मधील सर्व माहिती योग्य आहे का याची देखील खात्री करावी.
- त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडे आमचा लाभ बंद झाला आहे याबद्दल तक्रार नोंदवावी.
- निकषाचे पालन करत असाल तर e–kyc न चुकता पूर्ण करा.
लाडकी बहीण योजना ही फक्त निवडणुकीत चांगलं मत मिळावं यासाठी सुरू केलेले होती की खरंच महिलांना आर्थिक पाठबळ देण्याचं काम सरकार करत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारने यावर वेळेत पारदर्शकता निर्माण केली नाही तर महिलांच्या नाराजीचे स्वरूप मोठ्या आंदोलनात देखील निर्माण होऊ शकते. अनेक महिलांनी सरकारने आम्हाला वेड्यात काढला आहे असे देखील आरोप केले आहेत.
