Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यातील रहिवासी महिलांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वकांशी योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जात आहे. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचे निमित्त साधून जुलै महिन्याचा हप्ता देण्यात आला आहे. त्यानंतर आता लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील देण्यात येणार आहे. दरम्यान ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात कधी जमा होऊ शकतो? याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये कधीही महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात. दर महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. त्यामुळे यावेळीही महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा होऊ शकतात. याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर झाली नाही. ऑगस्ट महिना जमा होण्यासाठी संभाव्य तारीख 27 ऑगस्ट असू शकते. Ladki Bahin Yojana
हे पण वाचा| लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे 1500 रुपये न मिळण्याची काय कारणे आहेत? जाणून घ्या सविस्तर
सरकारची लाडक्या बहिणींना सणानिमित्त हप्त्याचे पैसे देण्याची परंपरा लक्षात घेता. गणेश उत्सवानिमित्त देखील लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे एक हजार पाचशे रुपये दिले जाऊ शकतात. अनेक वेळा सणाचा मुहूर्त साधून लाडक्या बहिणींना पैसे दिले जातात. त्यामुळे या महिन्यात सुरु होणाऱ्या गणेश उत्सवाच्या निमित्त लाडक्या बहिणींना पैसे मिळू शकतात. दरम्यान लवकरच सरकार याबाबत अधिकृत घोषणा करेल. जुलै महिन्याचा आता लांबणीवर गेला होता. त्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील लांबणीवर जाणार का असा प्रश्न देखील महिलांच्या वतीने उपस्थित केला जात आहे.
दरम्यान लाडकी बहिण योजनेची पडताळणी सुरू आहे. या योजनेअंतर्गत ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्यांना या योजनेतून अपात्र केला जात आहे. यामध्ये अनेक निकषाचे पालन करणाऱ्या महिलांना या योजनेतून बाद केले आहे. जर तुम्हाला देखील लाडक्या बहिणीचे पैसे आले नसतील तर तुमचा अर्ज देखील या योजनेतून वगळण्यात आला आहे असे समजा. मात्र जर तुम्ही पात्र असून देखील तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमची कंप्लेंट नोंदवू शकता.
2 thoughts on “लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर..”