Ladki Bahin Yojana | महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना मोठी आधार ठरत आहे. या योजनेच्या लाभातून राज्यातील महिला घर खर्च, मुलांच्या शाळेची फी, घरातील किराणा औषधे अशा अनेक प्रकारच्या आर्थिक गरजा भागवत आहेत. लाडक्या बहिणींना दरमहा मिळणाऱ्या 1500 रुपयांतून महिला त्यांच्या दैनंदिन आर्थिक गरजा पूर्ण करत आहेत. अनेक महिलांनी या योजनेतून आपला छोटासा व्यवसाय देखील सुरू केला आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना आतापर्यंत जुलै महिन्यापर्यंत पैसे मिळाले आहेत. त्यानंतर महिला ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. दरम्यान याबाबतच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
ऑगस्ट महिना संपून काही दिवस उलटले आहेत मात्र अजूनही लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला नसल्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत आहे. अनेक महिलांच्या तोंडातून लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला का नाही? कधी मिळणार? अशा प्रश्नांचा वर्षा होत आहे. दरम्यान सरकारकडून महत्त्वाची माहिती मिळाली आहे. यावेळेस महिलांना ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे. कारण ऑगस्टचा हप्ता उशिरा मिळाल्यामुळे तो सप्टेंबरच्या हप्त्यासोबत जमा करण्याबाबत सरकारकडून चर्चा होत आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्रित मिळणार का?
यापूर्वी देखील सरकारने एकाच वेळी दोन महिन्याचे पैसे महिलांना दिलेले आहेत. रक्षाबंधनाच्या सणानिमित्त सरकारने महिलांना दोन हप्त्याचे तीन हजार रुपये एकत्रित दिले होते. याच पार्श्वभूमीवर यावेळी ही दोन हप्त्याचे म्हणजे ऑगस्ट + सप्टेंबर 1500+1500= 3000 रुपये मिळू शकतात. असे झाले तर महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल. मात्र सरकारकडून याबाबत अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र महिलांना दोन महिन्याचे पैसे एकत्रित मिळतील अशी अपेक्षा लागली आहे.
हे पण वाचा| लाडक्या बहिणींना ऑगस्ट-सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळणार? ₹3,000 खात्यात जमा होण्याची शक्यता
पडताळणी सुरूच..
लाडकी बहीण योजनेतून सध्या लाखो महिला लाभ घेत आहेत. मात्र अनेक महिलांनी निकषा बाहेरून या योजनेचा लाभ घेतला असल्याचे समोर आले आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार जवळपास 26 लाख लाभार्थी महिला या योजनेतून अपात्र झाल्या असल्याचे समोर आले आहे. म्हणूनच प्रशासनाकडून या लाभार्थ्यांची सखोल छाननी सुरू आहे. योग्य लाभार्थ्यापर्यंतच या योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही महिलांना या योजनेतून बाहेर पडावे लागणार आहे. Ladki Bahin Yojana
महिलांची अपेक्षा
लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असणाऱ्या महिलांची एकच अपेक्षा आहे की दर महिन्याला मिळणारे 1500 रुपये आमच्यासाठी खूप मोठी रक्कम आहे. वेळेवर हा हप्ता महिलांच्या खात्यात जमा व्हावा. जर एकत्रित तीन हजार रुपये मिळाले तर घर खर्च सणासुदीचा खर्च भागवण्यासाठी मोठा दिलासा मिळेल. सरकारने आमचं म्हणणं दुखवता योग्य वेळी या योजनेचा निधी वितरित करावा. असे अनेक महिलांचे म्हणणं आहे.
लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदत देणारी योजना नसून, अनेक महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी व आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकारकडून महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. त्यामुळेच अनेक महिलांच्या मनात एवढीच आशा आहे की, हप्ता उशिरा का होईना पण योग्य वेळी योग्य रक्कम आमच्या खात्यात जमा व्हावी. थोडक्यात सांगायचं झालं तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता महिलांना एकत्रित मिळू शकतो. मात्र सरकारने अजूनही याबाबत स्पष्टता केली नाही.
1 thought on “Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींना आता एकत्रित ₹3,000 मिळणार? ऑगस्ट-सप्टेंबर हप्त्याबाबत मोठी अपडेट्स आली समोर”