Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार याची वाट राज्यातील लाखो महिला पाहत आहेत. ऑगस्ट महिना संपून काही दिवस झाले आहेत मात्र अजूनही महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झाला नाही. सरकारने याबाबत कोणतेही अधिकृत घोषणा देखील केली नाही. त्यामुळे अनेक महिलांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत. लाडकीला ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार? नेहमीप्रमाणे उशिरा मिळणार का? दोन हप्त्याचे पैसे एकत्रित मिळणार का? अशा अनेक चर्चा लाडक्या बहिणींमध्ये सध्या सुरू आहेत.
दरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. या महिन्यात लाडक्या बहिणींना एकाच वेळी दोन महिन्याचे पैसे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात एकत्रित मिळू शकतो. असं झालं तर महिलांना तब्बल तीन हजार रुपये एकत्रित मिळतील. हप्त्याचा निर्णय पुढे ढकलला की साधारणपणे पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याबाबत सरकारकडून घोषणा केली जाऊ शकते. त्यामुळे या आठवड्यात काहीतरी स्पष्ट होईल याबद्दल अपेक्षा व्यक्त होत आहे.
लाडकी बहिण योजनेची पडताळणी
लाडकी बहीण योजनेत अर्ज केलेल्या प्रत्येक महिलांचे अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत. तपासणी दरम्यान निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांना या योजनेतून अपात्र ठरवले जात आहे. त्यामुळे काही महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत. आत्तापर्यंत तब्बल 26 लाख महिलांचे अर्ज बाद झाले असल्याचे समोर आले आहे. ही संख्या अजून वाढू शकते त्यामुळे अनेक महिलांनी आपण या योजनेच्या निकषांमध्ये बसत आहात की नाही याची खात्री करून घ्यावी.
हे पण वाचा| लाडक्या बहिणींसाठी महत्वाची अपडेट! ऑगस्ट महिन्याचा हप्ता या दिवशी खात्यात जमा होणार? पहा सविस्तर
हप्ते एकत्र मिळणार का वेगवेगळे?
सप्टेंबर महिन्यात लाडके बहिणी योजनेचे दोन हप्ते जमा होणार आहेत. असं जवळपास निश्चित करण्यात आला आहे. मात्र हे पैसे एकाच वेळी खात्यात येणार की दोन टप्प्यांमध्ये खात्यात जमा होणार याबाबत अजून स्पष्टता अधिकृतपणे झाली नाही. लवकरच आदिती तटकरे यांच्याकडून याबाबत पोस्ट माहिती समोर येईल. Ladki Bahin Yojana
खेड्यापाड्यातील शेतकरी कुटुंबातील महिला असो व शहरातील रोजंदारी करणाऱ्या महिला असो प्रत्येकासाठी लाडकी बहिणी योजना वरदान ठरत आहे. त्यामुळे राज्यातील लाभार्थी महिला महिना सुरू झाला पासून महिना संपेपर्यंत लाडकी बहिण योजनेचे पैसे कधी मिळतील असा प्रश्न विचारत असतात. या पैशातून मुलांची फी भरावी घर खर्च भागवावा दवाखान्याचा खर्च भागवावा अशा अनेक समस्या महिलांसमोर उपस्थित होतात. त्यामुळे दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये मिळाल्यास महिलांना मोठा दिलासा मिळू शकतो.
लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांना आर्थिक आधार मिळतो. मात्र हप्त्याची वेळेवर घोषणा न झाल्यामुळे महिलांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. दोन हप्त्याचे तीन हजार रुपये एकत्र मिळाले तर महिलांचा या योजनेवरील विश्वास अधिक प्रबळ होईल. पण याबाबतची अधिकृत घोषणा होईपर्यंत लाडक्या बहिणींनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.