Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले होते. मुख्यमंत्री लडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील गोरगरीब महिलांना मोठा आर्थिक आधार देण्याचे काम सरकारने केले आहे. या योजनेचा महायुती सरकारला निवडणुकीमध्ये मोठा फायदा झाला. या योजनेतून महिलांना दरमहा ठराविक आर्थिक मदत दिली जात आहे. ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठा सकारात्मक बदल होत आहे. मात्र आता या योजनेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे ज्यामुळे अचानक सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
महिला आणि बाल विकास मंत्री अभिनेता तटकरे यांनी नुकतीच विधानसभेत एक मोठी आणि महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. या माहितीनुसार ज्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना आता या योजनेतून मिळणारे 1500 रुपये बंद करण्यात आले आहेत. आदिती तटकरे यांनी याबाबत लेखी उत्तर दिले असून ही घोषणा केवळ सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी आहे. Ladki Bahin Yojana
समोर आलेल्या आकडेवारीनुसार तब्बल 279 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा पात्र नसताना लाभ घेतला होता. ही संख्या खूप मोठी असून यामुळे योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारी कर्मचारी असल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळणे नियमानुसार अपेक्षित नव्हते तरीही त्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. याच सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ आता कायमचा बंद करण्यात येणार असल्याचे आदिती तटकरे स्पष्ट सांगितले आहे.
हे पण वाचा| महाराष्ट्रात आता मुसळधार पाऊस कधी होणार? पंजाबराव डख यांनी सांगितली तारीख… वाचा सविस्तर
3 कोटी 48 लाख रुपयाची वसुली होणार?
या सर्व प्रकरणातील सर्वात गंभीर म्हणजे पात्र नसतानाही या सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाडके बहिण योजनेचा तब्बल तीन कोटी 48 लाख रुपयाचा लाभ घेतला आहे. ही माहिती समोर येताच शासनाने यावर कठोर भूमिका घेण्याचे ठरवले आहे. आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचारी असून अयोग्य पद्धतीने या योजनेचा लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणीकडून हा सगळा पैसा वसूल करण्यात येईल. यामुळे सरकारी तिजोरीतून गेलेले पैसे परत आणण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या घटनेमुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. योजना सुरू करताना तिच्या लाभार्थ्यांसाठी कोण पात्र आहे आणि कोण नाही याची तपासणी करण्याची यंत्रणा प्रभावी नव्हती का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. कोट्यावधी रुपयाच्या गैरवापर होणे हे गंभीर असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक कठोर नियम आणि तपासणी यंत्रणा असणे आवश्यक आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या या घोषणेमुळे लाडकी बहीण योजनेची प्रतिमा काही प्रमाणात डागाळली असली तरी, शासनाने घेतलेली ही कठोर भूमिका गैरव्यवहार टाळण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे भविष्यात सरकारी योजनेचा गैरवापर होणार नाही योग्य लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवला जाईल अशी अपेक्षा आहे.
1 thought on “Ladki Bahin Yojana : ‘या’ लाडक्या बहिणींना 1500 रूपये मिळवणे बंद होणार? आदिती तटकरेंची मोठी माहिती..”