लाडक्या बहिणींनो तुमची बँक खात्यातील बॅलन्स चेक करा…. खात्यात किती जमा होणार 1500 की ₹3000? आली मोठी अपडेट समोर


Ladki Bhaeen Yojana June July Installment | राज्यातील लाखो महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. आज पासून महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. परंतु त्यापूर्वी तुमच्या खात्यात पैसे किती जमा झाले हे देखील जाणून घ्या. त्यासाठी हा लेख सविस्तरपणे वाचा. Ladki Bhaeen Yojana June July Installment

राज्यातील महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आता या योजनेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे ते म्हणजे जून जुलै महिन्याचे हप्त्याचे चे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले का? राज्य सरकारने या योजनेसाठी निधीची कमतरता दूर करत जून महिन्याचा हप्ता निधी वितरणाचे काम सुरू केले आहे यासोबत योजनेचा पात्र लाभार्थ्यांना वगळण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे.

जून महिन्याचा हप्ता आजपासून जमा

महिलांच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता आज पासून जमा होणार आहे याबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत सोशल मीडियावरती पोस्ट करत माहिती दिली. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता निधी वितरणास आज पासून सुरुवात झाली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात आजपासून हा निधी जमा होणार आहे. निधीच्या कमतरतेमुळे जून महिन्याचा हप्ता देण्यास विलंब झाला होता. मात्र अनुसूचित जाती घटकांसाठी असलेल्या 410 कोटी 30 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळालेले ही अडचण दूर झाली आहे.

जून जुलै महिन्याचा हप्ता एकत्रित येणाऱ्याशी चर्चा होती. मात्र अदिती तटकरे यांच्या माहितीनुसार फक्त जून महिन्याचे पैसे येणार आहेत. म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्यात मिळेल अशी शक्यता आहे.

तसंच ते पुढे बोलत असताना म्हटले की, महायुती सरकार दृढ निश्चय, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शन आणि महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा विश्वास यामुळे ही योजना यशस्वीपणे पुढे जात आहे. यापुढे योजनेची दमदार वाटचाल अशीच सुरू राहील.

अपात्र महिलांवरती कारवाई

या योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकार युद्ध पातळीवरती योग्य ते कारवाई करत आहे अलीकडे तपासणीत असे निदर्शनात आले की 2289 सरकारी कर्मचारी महिला या योजनेचा लाभ घेत होत्या, या योजनेतून त्यांना अपात्र करण्यात आला आहे महिलांना योजनेतून वगळण्यात आलं असून याबाबत माहिती देताना अदिती तटकरे यांनी विधानसभेत लेखी उत्तरात सांगितलेली, या योजनेत अपात्र व्यक्तींना लाभ मिळू नये यासाठी सतत छाननी केली जात आहे. अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याची प्रक्रिया पूर्णपणे झाली आहे.

आता राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे त्यांच्या खात्यात जून महिन्याचे दीड हजार रुपये जमा झालेले आहेत यामुळे नक्कीच तुम्हाला ही रक्कम महत्त्वाचे ठरणार आहे कारण रक्कम थोडी असली तरी वेळेवर कामे आल्यास ही एक मोठी रक्कम बनते.

हे पण वाचा | लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मोठी अपडेट आली समोर..

Leave a Comment

error: Content is protected !!