Lado Laxmi Yojana: देशातील महिलांच्या आर्थिक विकासासाठी वेगवेगळ्या राज्यातील राज्य सरकारने आर्थिक बळ देणाऱ्या योजना राबवल्या आहेत. मध्यप्रदेशच्या लाडली बहना योजना आणि महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर हरियाणा सरकारने ‘लाडो लक्ष्मी योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा थेट त्यांच्या बँक खात्यात 2,100 रुपयाचा लाभ मिळणार आहे. हरियाणाचे सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री कृष्णा बेदी यांनी नुकतीच या योजनेची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, नोव्हेंबर 2025 पासून या योजनेचा लाभ महिलांना मिळणार आहे. या योजनेमुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बळ व सामान्य घरातील महिलांना आर्थिक आधार मिळेल.
अर्ज प्रक्रिया कशी आहे?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा नोंदणी करण्यासाठी सरकारी कार्यालयात भटकंती करण्याची गरज भासणार नाही. 21 सप्टेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते एक खास मोबाईल ॲप लॉन्च केले जाणार आहे. या ॲपच्या मदतीने घरबसल्या महिला ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. तेवढेच नव्हे तर एका मोबाईल वरून वीस ते पंचवीस अर्ज सादर करण्याची सुविधा देखील उपलब्ध करण्यात येणार आहे. म्हणजेच गावातील महिलांना आता अर्जासाठी शहरात किंवा सरकारी कार्यालयात धावपळ करायची गरज भासणार नाही. सध्या मोबाईल वरून अर्ज करता येणे हे ग्रामीण महिलांसाठी फायद्याचे ठरणार आहे.
हे पण वाचा| लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये?
दरम्यान महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना गेल्या वर्षीपासून दरमहा १५०० रुपयांचा लाभ दिला जातो आहे. निवडणुकीच्या वेळी महिलांना 2100 रुपये देऊ अशा आश्वासन महायुती सरकारने दिले होते. मात्र अजून त्या निर्णयावर कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. सध्या राज्यात महिलांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अनेक महिला या योजनेतून अपात्र ठरत असल्यामुळे महिलांमध्ये नाराजी वर्तवली जात आहे. एकीकडे हरियाणा सरकारकडून 2100 रुपयांचा लाभ जाहीर केला असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील महिलांना अजूनही 1500 रुपयाचा लाभ मिळत आहे. Lado Laxmi Yojana
महिलांना आर्थिक आधाराची संधी
हरियाणा सरकारच्या या निर्णयामुळे गोरगरीब घरातील महिलांच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरमहा 2100 रुपयाच्या या लाभांमुळे अनेक घराचा घर खर्च भागवण्यास मदत होणार आहे. त्यामुळे गरीब कुटुंबातील महिलांसाठी हे दिलासा देणारे ठरत आहे. महिलांच्या खर्चात थोडीफार मदत होईल आणि महिलांना आर्थिक दृष्ट्या आधार मिळेल. महिलांना फक्त मदतीची आवश्यकता नसून स्वाभिमानाने जगण्यासाठी आत्मविश्वास देखील या योजनेतून मिळेल. म्हणूनच ही योजना केवळ 2100 रुपयाचा लाभ देणारी नसून महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारी योजना ठरत आहे. हरियाणा सरकारने ज्याप्रमाणे 2100 रुपयांचा निर्णय घेतला आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील लवकरच 2100 रुपये बाबत निर्णय घ्यावा अशी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीची अपेक्षा आहे.

1 thought on “आनंदाची बातमी! नोव्हेंबर महिन्यापासून ‘या’ महिलांना मिळणार दरमहा 2,100 रुपये? कोणाला मिळणार लाभ? पहा येथे”