LIC Scheme: सध्या या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला थोडीफार बचत करून त्यांचे आयुष्य सुखकर आणि भविष्यामध्ये मोठा फंड तयार करायचा असतो. परंतु सध्या प्रश्न पडतो की गुंतवणूक कुठे करावी रोज किती खर्च आणि कशी बचत करायची कारण रोजचा खर्च, मुलाचे शिक्षण, घर खर्च, दवाखाना, वीज बिल या सगळ्यात जास्त पैसे खर्च होतात. मात्र जर तुम्ही दररोज फक्त चहा नाष्टा एवढे पैसे गुंतवणूक करून भविष्यात 25 लाख रुपयांचा फंड तयार करू शकता. होय खर आहे का? खर आहे. कारण भारतीय आयुर्विमा महामंडळची (LIC) एक भन्नाट योजना सुरू झालेली आहे. आणि ही योजना आहे जीवन आनंद पॉलिसी योजना चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती
एलआयसी ही देशातील सगळ्यात मोठी विमा कंपनी आहे आणि सामान्य माणसाची पैशाची किंमत ओळखणारी मोठी संस्था आहे. अनेक लोक यावरती विश्वास ठेवून गुंतवणूक करता. आणि एलआयसी ने त्यांच्या ग्राहकांसाठी एक भन्नाट योजना आणलेली आहे. यामध्ये बचत आणि विमा संरक्षण दोन्ही मिळतं
जीवन आनंद नावाची योजना खास आहे आणि सध्या चर्चेत देखील आहे कारण यामध्ये रोज फक्त 45 रुपये गुंतवणूक करून भविष्यात 25 लाख रुपयांचा फंड तयार होतो.
एलआयसी योजना फंड कॅल्क्युलेशन ?
जर समजा तुम्ही रोज 45 रुपये गुंतवले म्हणजे महिन्याला सुमारे 1358 रुपये झाले. वर्षभरात तीच रक्कम झाली 16 हजार तीनशे रुपये आणि अशी भरपाई तुम्ही 35 वर्षे चालू ठेवली तर तुमची एकूण गुंतवणूक होईल सुमारे पाच लाख 70 हजार पाचशे रुपये. मात्र एलआयसी इथे तुमचे पैसे फक्त ठेवून देत नाही. या पॉलिसी तुम्हाला मूळ रकमे सोबत बोनस आणि अतिरिक्त लाभ मिळतो. आणि हाच बोनसच्या जोरावर पॉलिसीच्या शेवटी तुमच्या हातात येणारा फंड तब्बल 25 लाख रुपये पर्यंत पोहोचतो.
पंचवीस लाख कसे तयार होतात?
पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यावर तुम्हाला तीन गोष्टी मिळतात. मूळ विमा रक्कम (सुमारे पाच लाख रुपये) सुधारित बोनस (8.6 लाख रुपये, अंदाजे) अंतिम अतिरिक्त बोनस (11.5 लाख रुपये, अंदाजे) हे सगळे एकत्र केल्यावर तुमच्या हातात येतात पंचवीस लाख रुपये. म्हणजेच छोट्या छोट्या बचतीतून तुम्ही तुमच्या आयुष्यभराचा मोठा फंड तयार करू शकता आणि त्याला आधार देत आहे एलआयसीची ही योजना.
तसेच या योजनेचा दुसरा मोठा फायदा म्हणजे विमा संरक्षण देखील मिळत. जर पॉलिसी सुरू असताना दुर्दैवाने पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला, तर कुटुंबाला 125% विमा रक्कम थेट बेनिफिटच्या स्वरूपात मिळतो. म्हणजे घरच्यांना मोठा आधार मिळतो. तसेच या योजनेसोबत एलआयसी चार वेगळ्या रायडर्स जोडण्याची सुविधा देते. हे रायडर्स घेतल्यास संरक्षण आणखी वाढतं. अपघाती मृत्यू रायडर, अपंग रायडर, क्रिटिकल इलनेस रायडर, टर्म इन्शुरन्स रायडर इत्यादी.
जर तुम्ही देखील या योजनेमध्ये गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर ही योजना खरच तुमच्यासाठी उत्तम आहे. यामध्ये नोकरी करणाऱ्या मध्यमवर्गीय जे रोज थोडे थोडे बाजूला पैसे काढू शकतात. लहान व्यापारी, दुकानदार, रोजंदारीवर काम करणारे लोक. मुलांच्या शिक्षणासाठी मुलीच्या लग्नासाठी किंवा निवृत्तीनंतर सुरक्षिततेसाठी फंड उभारायचा आहे अशांसाठी ही योजना उत्तम आहे.
(Disclaimer: वरील दिलेली माहिती केवळ माहिती करिता आहे आम्ही कुठलेही आर्थिक गुंतवणुकी बाबत सल्ला देत नाही व प्रोत्साहन देत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.)
हे पण वाचा | LIC ची भन्नाट योजना! या योजनेत एकदाच करा गुंतवणूक आणि मिळवा आयुष्यभर लाखो रुपयांची पेन्शन..