Loan Waiver: महाराष्ट्रात पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा आश्वासन महायुती सरकारने दिले होते. या हंगामात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांकडून सातत्याने कर्जमाफीची मागणी केली जात आहे. विरोधी पक्षाने ही विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारला या मुद्द्यावरून घेऱ्यात धरलं होतं. शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार असा थेट सवाल सरकारला विचारण्यात आला.
सरकारकडून यावर तात्काळ निर्णय घेण्यात आला नाही. कर्जमाफी कशी करावी आणि कोणत्या शेतकऱ्यांना द्यावी याचा अभ्यास करण्यासाठी सरकारने एक समिती नेमली आहे. ही समिती लवकरच आपला अहवाल सादर करणारा असून त्यानुसार अंतिम निर्णय घेण्यात येईल. दरम्यान याच पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशी अपेक्षा वाटू लागली आहे. Loan Waiver
हे पण वाचा| ई-पीक पाहणीचं नवीन मोबाईल ॲप आलं! पीक नोंदणी उशिरा केली तर नुकसान तुमचंच..
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे
बावनकुळे म्हणाले, सरसकट कर्जमाफी करून फार्म हाऊस बांधणाऱ्या किंवा मोठमोठे बंगले उभारणार यांना फायदा मिळणार नाही. खरी मदत ज्या गोरगरीब शेतकऱ्यांना मिळायला हवी ज्यांच्या शेतात काही पिकत नाही, जे शेतकरी शेती करून खऱ्या अर्थाने संघर्ष करत आहेत. जे शेतकरी आत्महत्या च्या टोकावर येऊन ठेपले आहेत अशा शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळणार आहे. असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
ते यापुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधिमंडळात स्पष्टपणे सांगितले आहे की खरी कर्जमाफी फक्त गरजू शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्याचा अर्थ असा होतो की, यावेळी राज्यात सरसकट कर्जमाफी मिळणार नाही. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफीची गरज आहे त्यांनाच कर्जमाफी योजनेचा लाभ दिला जाणारा असल्याचे स्पष्ट होते.
निसर्गाने दगा दिलेला, पिक न आलेला, सतत कर्जाच्या ओझ्याखाली असणारा आणि आत्महत्येच्या मार्गावर गेलेल्या शेतकऱ्यांनाच केंद्रस्थानी ठेवून कर्जमाफी केली जाणार. अशा शेतकऱ्यांचे वैयक्तिक सर्वेक्षण करूनच कर्जमाफी केले जाईल असे बावनकुळे यांनी सांगितले आहे. राज्यातील शेतकरी सध्या वाढत्या महागाईमुळे आणि घटत्या उत्पन्नामुळे खूपच त्रस्त आहेत. अनेक शेतकऱ्यांना आधीच्या कर्जमाफीच्या योजनेचा अपेक्षित लाभ मिळालेला नाही. अशावेळी पुन्हा कर्जमाफीची चर्चा रंगल्यामुळे त्यांच्या मनात नवीन अशा निर्माण झाले आहे. सरसकट कर्जमाफी होणार नाही हे मात्र स्पष्ट करण्यात आले आहे.