LPG Cylinder Subsidy | घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भर येऊ नये यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने तेल उत्पादक कंपन्यांसाठी तब्बल 30 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तिन्ही सरकारी तेल कंपन्यांना बारा समान हप्त्यांमध्ये ही मदत देण्यात येणार आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारातील पीजे गॅस सिलेंडरच्या किमती प्रचंड वाढल्या होत्या. पण सरकारने सामान्य नागरिकांच्या खिशाला चटका बसू नये म्हणून देशांतर्गत किमतीत मोठा बदल होऊ दिला नाही.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे या तेल कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. आता या नुकसानीची भरपाई सरकार थेट स्वतः करणार आहे. रक्षाबंधनाच्या अगोदरच सरकारने प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिलासा दिला होता. 2025 26 या आर्थिक वर्षासाठी उज्वला लाभार्थ्यांना 14.2 किलोच्या गॅस सिलेंडरवर तीनशे रुपयांच्या अनुदान मिळणार आहे. एका वर्षात जास्तीत जास्त नऊ सिलेंडरवर हे अनुदान लागू केल्या जाणार आहे. यासाठी सरकारने 12 हजार 60 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे.
हे पण वाचा| रेशन कार्डमधील चूक घरबसल्या मोबाईलरून फक्त 5 मिनिटांत दुरुस्त करा; जाणून घ्या सोपे पद्धत
सध्या भारतात 10.33 कोटी उज्वला योजनेअंतर्गत कनेक्शन आहेत. म्हणजेच ग्रामीण भागातील आणि कमी उत्पादन गटातील महिलांना स्वयंपाकासाठी परवडणाऱ्या किमतीत गॅस सिलेंडर मिळावा त्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्याच्या घरात स्वयंपाक तयार करण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण न व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. LPG Cylinder Subsidy
कंपन्यांना सरकारकडून मिळणाऱ्या या अनुदानामुळे इंडियन ऑइल, BPCL आणि LPCL या कंपन्यांना केवळ नुकसान भरपाई मिळणार नाही तर कच्चे तेल आणि एलपीजी खरेदी करण्यासाठी कुठूनही कर्ज घेण्याची गरज नाही आणि नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आर्थिक बळ मिळेल. त्यामुळे देशात गॅस पुरवठा मोठ्या प्रमाणात राहणार आहे. वाढत्या महागाईमुळे एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीतही वाढ होत आहे. मात्र सरकार सर्वसामान्यांपर्यंत गॅस सिलेंडरचा लाभ जावा यासाठी उज्वला योजनेअंतर्गत अनुदान देत आहे.
भारतामध्ये सुमारे 60% LPG आयात केला जातो. त्यामुळे जागतिक बाजारातील किमतीमध्ये होणारा बदल थेट आपल्या देशातील एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीवर परिणाम करतो. अशा परिस्थितीत सरकारची ही आर्थिक मदत आणि सबसिडी योजना ग्राहकांसाठी अतिशय दलासाधारक ठरत आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय अनेक स्वयंपाक घरातील महिलांच्या चेहऱ्यावरील हसू कायम ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. कारण गॅस सिलेंडर ही केवळ वस्तू नसून रोजच्या आयुष्यातील चवीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारी वस्तू आहे.
1 thought on “LPG Cylinder Subsidy | एलपीजी गॅस सिलेंडर धारकांसाठी महत्त्वाची बातमी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर”