LPG गॅस सिलेंडर धारकांसाठी महत्त्वाची बातमी! ‘हे’ काम न केल्यास गॅस सिलेंडर मिळणार नाही…


LPG Gas Cylinder New Update: जर तुम्ही एलपीजी गॅस सिलेंडर धारक असाल तरी ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही अजून ई केवायसी पूर्ण केली नसेल तर अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. कारण आता ई केवायसी न केलेल्या ग्राहकांना ऑनलाईन गॅस सिलेंडर बुक करता येणार नाही. एवढेच नव्हे तर त्यांना गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी देखील अडचणीचा सामना करावा लागू शकतो. पेट्रोलियम कंपन्यांनी या संदर्भात कठोर पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

मागील अनेक दिवसापासून पेट्रोलियम कंपन्या त्यांच्या गॅस ग्राहकांना ई केवायसी पूर्ण करण्यासाठी सातत्याने आव्हान करत आहे. ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक याबद्दल अनेकदा संदेश पाठवले जात आहेत. मात्र तरी देखील अनेक ग्राहकांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. आता ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. ज्या ग्राहकांनी ई केवायसी केली नाही त्यांना आता ऑनलाईन गॅस बुकिंग ची सुविधा देखील मिळणार नाही. त्याचबरोबर त्यांना गॅस सिलेंडर मिळवण्यास देखील अडचणी निर्माण होऊ शकतात. ज्यामुळे त्यांची गैरसोय होणार आहे.

ई केवायसी का करावी?

प्रत्येक एलपीजी ग्राहकाने ई केवायसी करणे अनिवार्य का आहे. याचे मुख्य कारण आहे की, योग्य आणि अधिकृत ग्राहकांची ओळख पटवून देणे वेळेवर गॅस सिलेंडरचा पुरवठा निश्चित करणे अनेकदा चुकीच्या पत्त्यावर किंवा अनधिकृत व्यक्तींना गॅस सिलेंडर मिळत असल्याचे प्रकरण समोर येतात. अशा प्रकारच्या गैर व्यवहारांना टाळण्यासाठी आणि गॅस वितरण प्रणाली अधिक पारदर्शक व कार्यक्षम बनवण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे त्यातील बदल किंवा इतर आवश्यक माहिती अपडेट करण्याची सोय देखील मिळणार आहे.

हे पण वाचा| लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! या दिवशी मिळणार जून महिन्याचे 1500 रुपये? अजितदादांची मोठी घोषणा..

ई केवायसी कशी करावी?

ई केवायसी करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. यासाठी तुम्हाला काही गोष्टी सोबत घेऊन जाव्या लागतील.

  • तुम्हाला ज्या गॅस कंपनीकडून श्रीनगर मिळत आहे त्या एजन्सीच्या कार्यालयात जावे लागेल.
  • एजन्सी मध्ये जाताना तुमच्याकडे आधार कार्ड गॅस डायरी आणि तुमचा मोबाईल फोन सोबत असणे आवश्यक आहे.
  • तिथे तुमची बायोमेट्रिक पद्धतीने ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यासाठी आधार कार्ड आणि तुमचा गॅस ग्राहक क्रमांक आवश्यक आहे.
  • जा ग्राहकांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे त्याच व्यक्तीचे नाव आधार कार्डवर असणे आवश्यक आहे.

ऑनलाइन ई केवायसी कशी करावी?

जा ग्राहकांना गॅस एजन्सीला भेट देणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन ई केवायसी करण्याचा पर्याय देखील देण्यात आला आहे. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम सबंधित गॅस कंपनीचे मोबाईल ॲप डाऊनलोड करावे लागेल आणि त्याद्वारे तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. हा पर्याय युवा पिढीसाठी खूप महत्त्वाचा ठरत आहे ज्यांना तंत्रज्ञानाची माहिती आहे त्यांच्यासाठी ऑनलाईन केवायसी सोपी आहे. LPG Gas Cylinder New Update

जर तुम्हाला गॅस सिलेंडरची सेवा बिना अडथळ्याची उपभोगायचे असेल तर ई केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तातडीने पूर्ण करून घ्या. अन्यथा तुम्हाला भविष्यात गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागू शकतो. त्यासोबतच ऑनलाइन बुकिंग ची सुविधा देखील बंद होऊ शकते. या नियमाचे पालन करून तुम्ही शासनाच्या या चांगल्या उपक्रमात सहभागी होऊ शकतात आणि बिना अडथळा गॅस सिलेंडरची सेवा मिळवू शकतात.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

error: Content is protected !!