जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती घसरल्या; जाणून घ्या नवीन गॅस सिलेंडरचे दर


LPG Gas Cylinder Price: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये बदल होत असतो. दरम्यान आज एक जुलै 2025 आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज तेल वितरण कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती जाहीर केल्या आहेत. यामध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्याचे दिसत आहे. एक जुलैपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत लक्षणीय घट झाले असून याचा मोठा फायदा व्यवसायकांना होणार आहे.

एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी घसरण

एक जुलै 2025 रोजी तेल वितरण कंपन्यांनी 19 किलो एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये साठ रुपयाची घसरण झाल्याचे सांगितले आहे. या नवीन दर जाहीर झाल्यानंतर दिल्लीतील 19 किलो व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1665 रुपये झाली आहे. मुंबई कोलकत्ता आणि चेन्नई यासारख्या प्रमुख शहरांमध्ये या किमती कमी झाल्या आहेत. यामुळे हॉटेल रेस्टॉरंट आणि व्यावसायिक आस्थापनांना मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती घसरल्यानंतर फक्त व्यवसायकांना फायदा होत नाही तर सर्वसामान्य नागरिकांना देखील मोठा फायदा होतो.

हे पण वाचा| महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट..

शहरानुसार नवीन व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर

  • दिल्ली 1665 रुपये
  • मुंबई 1616 रुपये
  • कोलकत्ता 1769 रुपये
  • चेन्नई 1823.50 रुपये

गेल्या महिन्यात म्हणजे जूनमध्ये व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती चोवीस रुपयांनी कमी झाल्या होत्या. त्यानंतर सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये घसरण झाली आहे.

घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती काय आहे?

जुलै महिन्याच्या सुरुवातीला व्यवसाय एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती जरी घसरल्या असल्या तरी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. तुम्ही जर घरगुती गॅस सिलेंडरचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी सध्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती काय आहेत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्याचे दर जून महिन्याप्रमाणेच स्थिर असल्यामुळे घरगुती ग्राहकांना अजूनही तितकी रक्कम मोजावी लागणार आहे.

हे पण वाचा| शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 1,50,000 रुपयांचे अनुदान मिळणार? राज्य सरकारची मोठी घोषणा…

शहरानुसार आजचे 14.2 किलो घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे दर

  • मुंबई 852.50
  • पुणे 856 रुपये
  • दिल्ली ८५३ रुपये
  • अहमदाबाद 860 रुपये
  • जयपुर 856.5 रुपये
  • पटना 942.5 रुपये
  • आग्रा 865.5 रुपये
  • गाजियाबाद 850.5 रुपये
  • भोपाळ 858.5 रुपये
  • मेरठ 860 रुपये
  • लुधियाना 880 रुपये
  • वाराणसी 916.5 रुपये
  • लखनऊ 890.5 रुपये
  • हैदराबाद 905 रुपये
  • बेंगळुरू 855.5 रुपये

घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडर मध्ये काय फरक आहे?

अनेक जणांना प्रश्न पडतो घरगुती आणि व्यवसाय गॅस सिलेंडर मध्ये नेमका फरक काय आहे? हे दोन्ही सिलेंडर त्यांच्या वापराच्या उद्देशाने आणि काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यानुसार भिन्न असतात. LPG Gas Cylinder Price

हे पण वाचा | LPG गॅस सिलेंडर धारकांसाठी महत्त्वाची बातमी! ‘हे’ काम न केल्यास गॅस सिलेंडर मिळणार नाही…

घरगुती सिलेंडर:

  • घरगुती सिलेंडर साधारणपणे 14.2 किलोचा असतो.
  • हा सिलेंडर प्रामुख्याने घरी स्वयंपाक करण्यासाठी वापरला जातो.
  • या सिलेंडरवर सरकारकडून अनुदान दिले जाते ज्यामुळे त्यांची किंमत व्यावसायिक सिलेंडरच्या तुलनेत खूप कमी असते.
  • घरगुती सिलेंडर साठी सुरक्षा मानके वेगळी असतात आणि ती घरगुती उपकरणास सुरक्षितपणे वापरली जातात.
  • हे सिलेंडर गॅस एजन्सी आणि डीलर्सकडून सहजपणे उपलब्ध होतात. या सिलेंडरची बुकिंग ग्राहक घर बसून ऑनलाइन पद्धतीने करू शकतात.

व्यावसायिक गॅस सिलेंडर

  • व्यावसायिक गॅस सिलेंडर साधारणपणे 19 किलो वजनाचे असते.
  • हा सिलेंडर केवळ व्यवसाय करण्यासाठी वापरला जातो यामध्ये हॉटेल मेस विविध रेस्टॉरंट किंवा खाद्यपदार्थांचे दुकान इत्यादींचा समावेश होतो.
  • या सिलेंडरवर कोणत्याही सरकारी अनुदान दिले जात नाही यामुळे त्याची किंमत पूर्णपणे बाजारानुसार असते.
  • व्यावसायिक कामासाठी घरगुती सिलेंडर वापरण्यास कायदेशीर बंदी आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास दंड आकारला जाऊ शकतो.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती घसरल्या; जाणून घ्या नवीन गॅस सिलेंडरचे दर”

Leave a Comment

error: Content is protected !!