22 सप्टेंबरपासून स्वस्त होणार LPG सिलेंडर? GST कपातीनंतर ग्राहकांना मिळणार दिलासा; वाचा सविस्तर

LPG Gas Cylinder Update: सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाचे बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसापासून केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूवरील GST कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बाजारात उत्सुकतेच वातावरण निर्माण झाला आहे. अनेक वस्तूंच्या किमतीत घट होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वांच्या जीवनातील अति आवश्यक एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत स्वस्त होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 3 सप्टेंबर रोजी झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत मोठा बदल करण्यात आला आहे. यामध्ये 12 आणि 28 टक्क्याचे स्लॅब आठवण पाच आणि 12% चे दोन स्लॅब ठेवण्यात आले आहेत. हा निर्णय 22 सप्टेंबर पासून लागू होणार असल्यामुळे याचा थेट परिणाम प्रत्येकाच्या स्वयंपाक घराची होऊ शकतो. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीवर याचा परिणाम होणार का? याबद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

घरगुती आणि व्यवसाय गॅस सिलेंडर वर किती टक्के जीएसटी आहे?

सध्या सरकार घरगुती आणि व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडरवर वेगवेगळ्या प्रकारची जीएसटी आकारते. घरगुती सिलेंडरवर केवळ पाच टक्के जीएसटी आकारली जाते. तर व्यावसायिक गॅस सिलेंडरवर तब्बल 18% जीएसटी आकारली जाते. 22 सप्टेंबर पासून, सामान्य कुटुंबीयांचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि व्यापारी वर्गांना देखील आर्थिक दिलासा मिळू शकतो. LPG Gas Cylinder Update

हे पण वाचा| लाडक्या बहीणींसाठी महत्वाची बातमी! दरमहा ₹1500 मिळवण्यासाठी आता करावं लागणार ‘हे’ काम, अन्यथा…

GST कपातीमुळे सिलेंडर स्वस्त होणार का?

सध्या सर्वसामान्य नागरिकांना एकच प्रश्न पडला आहे जीएसटी कपातीमुळे एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार का? नुकत्याच झालेल्या जीएसटी बैठकीमध्ये अनेक जीवनावश्यक वस्तू स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र यामध्ये एलपीजी गॅसच्या दरात कोणताही बदल जाहीर करण्यात आलेला नाही. म्हणजेच 22 सप्टेंबर पासून जीएसटी कपातीचा फायदा सिलेंडरवर मिळणार नाही. घरगुती सिलेंडर आणि व्यावसायिक सिलेंडर दोन्हीचे दर जसे आहेत तसेच राहणार आहेत.

ग्राहकांमध्ये संभ्रम…

सध्या महागाईच्या झाडा सर्वसामान्य खिशाला बसत आहे. भाजीपाला धान्य पेट्रोल डिझेल या सर्व वस्तूंच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सर्वसामान्याच्या बचट वर याचा थेट परिणाम होत आहे. अशातच गॅस सिलेंडरचे दर कमी होतील अशी अपेक्षा होती. मात्र सरकारने एलपीजी गॅस गॅस सिलेंडरच्या GST मध्ये कोणतीही सवलत दिलेली नाही.

एलपीजी गॅस सिलेंडर हा तुमच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. सरकारने इतर वस्तूवर दिलेल्या जीएसटी कपातीचा फायदा जरी लोकांना होत असला तरी सिलेंडर मात्र पूर्वीच्या दरानेच विकले जाणार असल्यामुळे लोकांमध्ये नाराजी दिसत आहे. सर्वसामान्याच्या घर खर्चात थोडी कपात होईल अशी अपेक्षा होती मात्र ती देखील नाहीशी झाली आहे. सरकारने जीवनावश्यक वस्तूवर जीएसटी कमी करावी अशी अपेक्षा प्रत्येकांना आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “22 सप्टेंबरपासून स्वस्त होणार LPG सिलेंडर? GST कपातीनंतर ग्राहकांना मिळणार दिलासा; वाचा सविस्तर”

Leave a Comment

error: Content is protected !!