Maharashtra Police Bharti: महाराष्ट्रातील पोलीस भरती करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यातील सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांचा एकच प्रश्न होता पोलीस भरती कधी निघणार? गेल्या अनेक महिन्यापासून भरतीची वाट बघत असलेल्या युवकांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. गावोगावी या भरतीबाबत चर्चा सुरू होती. शेवटी सरकारने तरुणांची प्रत्यक्ष संपवली आहे. महाराष्ट्र पोलीस दलात तब्बल 15631 पदांसाठी मेगा भरती होणार असल्याचे शासन निर्णय अखेर जाहीर करण्यात आला आहे.
कोणत्या पदासाठी भरती होणार?
राज्य सरकारच्या आदेशानुसार ही भरतीत सर्वाधिक पोलीस भरती शिपाई पदासाठी होणार आहे. यामध्ये एकूण 12,399 जागा पोलीस शिपाई पदासाठी भरल्या जाणार आहेत. Maharashtra Police Bharti
- पोलीस शिपाई चालक – 234 पदे
- बॅण्डसमन – 25 पदे
- सशस्त्र पोलीस शिपाई – 2393 पदे
- कारागृह शिपाई – 580 पदे
यामुळे अनेक तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याचे दार उघडण्यात आले आहे.
हे पण वाचा| मध्य रेल्वेत 2,418 पदासाठी मेगाभरती! नोकरी करण्याची सुवर्णसंधी, अर्जप्रक्रिया सुरू..
भरती प्रक्रिया कधीपासून होणार?
जानेवारी 2024 पासून ची रिक्त पदे या भरतीत भरण्यात येणार आहेत. या आधी 12 गोष्ट रोजी झालेल्या राज्य मंडळाच्या बैठकीत पोलीस भरतीला मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर शासकीय प्रक्रिया पूर्ण होताच आता अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. लवकरच भरती संदर्भातील वेळापत्रक आणि नोटिफिकेशन जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अधिकृत घोषणाकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
पोलीस मध्ये नोकरी करण्याचे सुवर्णसंधी
राज्यातील अनेक तरुण गेल्या काही वर्षापासून पोलीस दलात सामील होण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करत आहेत. कोणाचे वडील शेतकरी आहेत कोणाचे मजुरी करून घर चालवत आहेत. पण या भरतीत निवड होऊन अंगावर वरती चढवण्याचे स्वप्न प्रत्येक तरुणांच्या डोळ्यात असते. आता सरकारच्या या निर्णयामुळे त्याची मेहनत सार्थकी लागण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.
भरती प्रक्रियेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे–आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, क्रीडा प्रमाणपत्र, हे सर्व कागदपत्रे उमेदवारांनी वेळेत तयार ठेवावी. कारण नोटिफिकेशन आल्यानंतर अर्जाची मुदत कमी असते तसेच शारीरिक चाचणीसाठी तरुणांनी आतापासूनच व्यायामाला आणि धावण्यासाठी सुरुवात करावी.
पोलीस भरतीला हिरवा झेंडा—या एका वाक्याने हजारो तरुणांच्या आयुष्यात नव्या अशा निर्माण झाल्या आहेत. ही केवळ नोकरी नाही तर समाजसेवेचे आणि देशसेवेचे एक मोठे व्यासपीठ आहे. ज्या हाताने कधी शेतात नांगर चालवला विटा उचलल्या त्या हातात आता बंदूक आणि कायद्याची ताकद येणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक तरुणांना ही सुवर्णसंधी मिळणार आहे. पोलिसाची वर्दी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची हीच सुवर्णसंधी आहे.