Maharashtra Rain Alert | राज्यात वातावरणात पुन्हा एकदा बदल झालेला आहे यामुळे शेतकरी बांधवांनो हा हवामान अंदाज व्यवस्थित प्रकारे समजून घ्या. कारण पुन्हा परिस्थिती उद्भवल्यास तुम्हाला मदत करण्यास मदत होईल. राज्याच्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा गंभीर वळण आलेला आहे. हवामान अंदाज मध्ये राज्यात काही दिवस पावसाचे विश्रांती असल्याचे म्हटले होते. परंतु आज पुन्हा एकदा वातावरणात बदल झाल्याने हवामान विभागाने अधिकृतरित्या इशारा दिला आहे की महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे यामुळे मोठा फटका बसू शकतो. राज्यातील कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्हे आता अलर्ट मोड वरती आहे. काही जिल्ह्यांना येलो अलर्ट, तर आता काही ठिकाणी ऑरेंज आणि काही ठिकाणी थेट रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. पावसाचा हा झटका फक्त शहरी भागांपुरता मर्यादित न राहता शेतकऱ्यांनाही मोठा आर्थिक धोका पोहोचवू शकतो. Maharashtra Rain Alert
महाराष्ट्र बातमी सोबत जोडण्यासाठी इथे क्लिक करा
कोकणामध्ये मोठा इशारा
कोकण हा परिसर नैसर्गिक रित्या खूप सुंदर आहे. परंतु आता या पावसामुळे या ठिकाणी थोडासा धोका निर्माण झालेला आहे आणि जबरदस्त कहर पाहायला मिळू शकतो. या पार्श्वभूमी वरती, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे.
हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार, किनारपट्टी परिसरामध्ये चक्रकार वाऱ्यांची शक्यता असून नद्या नाल दुथडी भरून वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा आव्हान सध्या करण्यात आलेले आहे. यामुळे मच्छीमारांनी हवामान अंदाज आकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे.
मध्य महाराष्ट्रात विशेष अलर्ट जारी
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा व कोल्हापूर या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विशेषता पुणे शहरातील सकल भागात पाणी साचण्याचा मोठा धोका निर्माण होऊ. नाशिक जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. यामुळे रस्त्यांची स्थिती खराब होण्याची दाट शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पिकाने फळबागांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपयोजना करण्याची गरज आहे.
मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता?
बाकीच्या भागांपैकी मराठवाड्यामध्ये देखील हवामान विभागाने विशेष अंदाज जाहीर केलेला आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्याचे केंद्रबिंदू छत्रपती संभाजीनगर, तर बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. ढगा हवामानामुळे दिवसभर नैराश्य पूर्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना देण्यात आले आहे की पावसात शेतात काम करताना सावधगिरी बाळगावी. कारण वीज पडण्याची शक्यता अधिक आहे. पिकांवरील फवारणी, सिंचन यासारख्या काम तात्पुरती थांबावीत.
विदर्भामध्ये डायरेक्ट रेड अलर्ट
विदर्भामध्ये थोडीशी परिस्थिती गंभीर असून शेतकरी बांधवांना हा हवामान अंदाज थोडासा लक्षात घेण्यासारखा आहे. नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये अति मुसळधर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तरी या पार्श्वभूमी वरती हवामान विभागाने Red alert जारी केलेला आहे. तर या दोन जिल्ह्या व्यतिरिक्त चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे तिथे राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी हलवावं, असा इशारा देण्यात आलेला आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्थानिक प्रशासनाचे निर्देश पाळावेत.
शेतकऱ्यांसाठी काही विशेष सूचना
राज्यातील परिस्थिती हळूहळू बदलत चाललेत असल्याने हवामान विभागाने काही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये शेतात व फळबागांमध्ये पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था तातडीने करा. विजेच्या कडकडाट मध्ये शेतात काम करणे टाळावं. वादळी वाऱ्यांपासून पिकांचं आणि झाडांचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/ नेट्स वापर करा. पाणी साचूनही म्हणून धान, मका यासारख्या पिकांच्या मुळाभोवती मातीचा ओडिसा तयार करा. शेतमजूर व गुरांनाही सुरक्षित स्थळी ठेवावं.
हवामान विभागाच्या सध्या इशारानुसार पुढील 48 तासात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी आणि पुढील हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करत चला.
हे पण वाचा | Weather Alert | महाराष्ट्रावर मुसळधार पावसाचे मोठे संकट, हवामान विभागाचा हाय अलर्ट