Maharashtra Weather Forecast : ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे, आणि महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे, अशातच शेतकऱ्यांची चिंता वाढत चाललेली आहे. त्यातच आता हवामाना खात्याचा नवीन अंदाज शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढवणार आहे. जुलैमध्ये अनेक ठिकाणी ढगफुटी सारखा पाऊस झाला परंतु काही ठिकाणी केवळ ढग जमा झाले परंतु पाऊसच पडला नाही अशातच शेतकऱ्यांना मोठी चिंता वाढत आहे. हवामान खात्याने थेट इशारा दिला असून ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. तर काही ठिकाणी तुरळ ठिकाणी पाऊस पडेल. यामध्ये मराठवाडा आणि खानदेश सारख्या भागात पुन्हा चिंता वाढलेली आहे. Maharashtra Weather Forecast
यंदा पावसाने लवकर हजेरी लावली खरी परंतु अपेक्षा प्रमाणे पाऊस झालेला नाही शेतकऱ्यांनी बी बियाणे टाकून आकाशाकडे डोळे लावून ठेवलेले आहेत. काही भागांमध्ये जुलै च्या सुरुवातीला जोरदार पाऊस झाल्यान पीक जोमात आलं. पण महिना अखेरीस चित्र बदललेला आहे. आता ऑगस्ट महिना सुरू झाला असला तरी मराठवाड्यातील अनेक भागात अद्याप पावसाने हजेरी लावलीच नाही यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
हवामान खात्याच्या ताज्या अपडेट नुसार विदर्भातील अनेक जिल्ह्यांना आज येलो अलर्ट दिलेला आहे. यामध्ये नागपूर, अकोला, अमरावती, गडचिरोली, वाशिम, भंडारा, गोंदिया या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. कोकणात देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामुळे तेथील नद्या आणि धरणांमध्ये पाण्याची वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात. पुण्याच्या खडकवासला धरणात 87 टक्क्याहून अधिक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शहरात पाणी कपात होण्याची शक्यता सध्या तरी नाही.
मराठवाड्यामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही दुष्काळ पडणार का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. या भागात जुलै महिन्यात समाधानकारक पाऊसच पडला नाही. त्यातच ऑगस्ट महिन्याची सुरुवात कोरडी झाली आहे यामुळे खरीप हंगामावरती मोठा प्रश्न उपस्थित होणार आहे. सरकारकडून अजून पर्यंत कुठलाही ठोस कृती आराखडा जाहीर करण्यात आलेला नाही. तर जुलै महिन्यात गोंदिया जिल्ह्यात दोन वेळा पूर परिस्थिती निर्माण झाली होती. पाच लोकांचा बळी गेला, तर 15 जनावर दगावली आणि सुमारे 720 घरांच मोठा नुकसान झालं. धरण भरली तरी परिस्थितीचं व्यवस्थापन न झाल्यामुळे हे नुकसान झाल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
हवामान खात्याने पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढू शकतो असे सांगितले असले तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने वेळ फारच महत्त्वाचे आहे. उशिरा येणारा पाऊस पिकाचं नुकसान करेल का वाचवेल असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. तसेच यापुढे देखील हवामान अंदाज जाणून घ्यायचा असल्यास आम्हाला फॉलो करत चला.
हे पण वाचा | IMD Weather Update : राज्यावरती ऑगस्ट महिन्यात एक मोठे संकट; आयएमडीचा नवीन अंदाज