Maharashtra Weather Update | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे अशातच भारतीय हवामान खात्याने एक मोठा हवामान अंदाज वर्तवत राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडणार असा इशारा दिलेला आहे. चला तर पाहूया कुठे आणि कोणता अलर्ट हवामान खात्याने जाहीर केलेला आहे. Maharashtra Weather Update
आता आलेल्या हाती अपडेट नुसार, अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या चक्रकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी विशेष सावध राहणे आवश्यक ठरणार आहे.
तर हवामान खात्याच्या नवीन अपडेट नुसार पाच ते नऊ जुलै दरम्यान राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिलेला आहे. या पार्श्वभूमी वरती पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावरती हवामान विभागाने red अलर्ट जारी केलेला आहे. मुंबई वगळता संपूर्ण कोकण किनारपट्टी मध्ये ऑरेंज अलर्ट तर कोल्हापूर, सातारा आणि नाशिकच्या घाटमाथ्यावरती देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. Maharashtra Weather Update
तसेच पुढे राज्यातील नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस ची शक्यता वर्तवलेली आहे अशाच पुढील हवामान अपडेट साठी आम्हाला फॉलो करत चला.
हे पण वाचा | Weather Alert | महाराष्ट्रावर मुसळधार पावसाचे मोठे संकट, हवामान विभागाचा हाय अलर्ट
1 thought on “Maharashtra Weather Update : राज्यामध्ये पुढचे चार दिवस मुसळधार पाऊस नवीन अलर्ट पहा!”