Maharashtra Weather Update | महाराष्ट्र मध्ये सध्या पावसाचं वातावरण तयार व्हायला सुरुवात झालेली आहे काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा काळकुट हवामान तयार झालेला आहे काही ठिकाणी पाऊस देखील पडत आहे. हवामान खात्याच्या ताज्या अपडेट नुसार, 3 ते 5 सप्टेंबर दरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्राला अतिवृष्टीचा तर विदर्भात मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यांवर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या आवाहन करण्यात आले आहे. Maharashtra Weather Update
हवामान विभागाने सांगितले की, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, त्यामुळे मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे. पुढील काय दिवस जग फुटी सारख्या सरींची शक्यता असून, नद्यांची पातळी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राला पावसाचा जबरदस्त फटका बसण्याची चिन्हे आहेत.
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर मध्ये गेल्या 24 तासात थोडा पाऊस झाला असला तरी पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. घाटमाथ्यावर जोरदार पाऊस कोसळत असल्याने प्रशासनाला सतर्क रहाव लागणार आहे. सातारा मध्ये गेल्या 24 तासांमध्ये थोडीशी नोंद झाली आहे पण पुढील दोन दिवसात अतिवृष्टी होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. तर कोल्हापूरमध्ये देखील पावसाची सुरुवात झाली असून तापमान घट झाली आहे. घाटमाथ्यावरील भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, तर उर्वरित भागात मध्यम सरीचा अंदाज आहे.
कोकण किनारपट्टीवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. हवामान खात्याने काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली आहे. यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्हांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते. यामुळे खाडी व नद्यांच्या पातळीत अचानक वाढ होऊ शकते. शेतकरी वर्गालाही या पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.