Maharashtra Weather Update | महाराष्ट्र मधील 19 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा अलर्ट वाचा सविस्तर माहिती

Maharashtra Weather Update | महाराष्ट्र मध्ये गेला काही दिवसांपासून पावसाच थैमान सुरू आहे. कुठे जोरदार पाऊस तर कुठे ढगफुटी सारखी परिस्थिती निर्माण झाली. या असा झालेला तुफान पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक गावात पाणी शिरलेले आहे. तर काही ठिकाणी जीवित हानी देखील झालेले आहे. सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. त्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे वाहून गेलेला आहे. अशातच शहरांमध्ये देखील वाहतूक ठप्प झालेले आहे. या सगळ्यात पार्श्वभूमी वरती लोक आता पाऊस कधी थांबणार? असा प्रश्न विचारत आहे. पण हवामान विभागाच्या नवीन अंदाजानुसार अजून दोन-तीन दिवस पाऊस महाराष्ट्र मध्ये कायम राहणार असून आजही तब्बल 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. Maharashtra Weather Update

मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून रात्रंदिवस पाऊस कोसळतोय. रस्ते, गल्ल्या, रेल्वे स्थानक सगळीकडे पाणी साचल्यामुळे प्रशासनाचे हाल झाले आहे. आजही मुंबईमध्ये ढगाळ वातावरण राहणारा असून ठीक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तापमान 29 सेल्सिअसच्या आसपास राहणार आहे.

कोकणातला रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांवर पावसाने धुमाकूळ घातलाय. इतिहास देखील अर्धा ते अति जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे. पिक पाण्यात बुडाल्यामुळे शेतकरी अक्षरशः हतबल झालेला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पावसाचा जोर वाढला तर नद्या नाल्यांना पुरविण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.

पडतील काही भागात पावसाचा कहर सुरू आहे. कालच आठ जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला होता. आज छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली सह सर्व जिल्ह्यांना इशारा देण्यात आलेला आहे. जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या अंगावरती काटा उभा राहिला आहे. अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्याने कापूस, सोयाबीन सारख्या पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

विदर्भातील अमरावती, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान खात्याने थेट येलो अलर्ट दिलेला आहे. तर अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरी पडतील असं सांगण्यात आलंय. उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांना जर विशेष अलर्ट नसला तरी पावसाच्या सरी सुरू राहतील.

हवामान खात्याने स्पष्ट केलं की, विदर्भ तेलंगण सीमेवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रभर पाऊस सक्रिय झाला आहे. त्यातच बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात चक्रकार वारे असल्याने पावसाला आणखी पोषक वातावरण मिळालं.

प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पावसाचा हा जोर वाढत असल्याने शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी थोडसं सावधगिरी बाळगणे खूप गरजेचे आहे आणि पुढील हवामानाकडे लक्ष ठेवायचे आहे. हवामान खात्याचा अपडेट कडे वेळोवेळी पहा.

Leave a Comment

error: Content is protected !!