वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रात प्रथमच पुढील पाच वर्षासाठी वीजदर कमी होणार


Mahavitran Electricity Rates: महाराष्ट्र राज्यातील वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने महावितरणे दाखल केलेल्या याचिकेवर ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे राज्यातील घरगुती औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्व ग्राहकांच्या वीज दरात पुढील पाच वर्षासाठी मोठी घसरण होणार आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदर कपातीचा प्रस्ताव सादर केला होता आणि आयोगाने त्यास मान्यता दिली आहे.

हे पण वाचा| बियाणांपासून ते ट्रॅक्टरपर्यंत! शेतकऱ्यांना पंचायत समितीकडून मिळणार विविध योजनांचा लाभ, असा करा अर्ज..

कोणाला होणार फायदा?

या निर्णयामुळे सर्वसामान्य पासून ते उद्योजकापर्यंत सर्वांनाच मोठा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या वर्षी तब्बल 10% वीजदार कमी होतील आणि टप्प्याटप्प्याने ही कपात पाच वर्षापर्यंत 26 टक्क्यापर्यंत पोहोचेल. राज्यात 100 युनिट पेक्षा जास्त वीज वापरणारे सुमारे 70% घरगुती ग्राहकांना सर्वाधिक म्हणजेच दहा टक्के करत कपात मिळणार आहे. केवळ घरगुती ग्राहकांनाच नव्हे तर औद्योगिक किंवा व्यावसायिक ग्राहकांना देखील वीज दरात मोठा फायदा होणार आहे त्यामुळे या ग्राहकासाठी बातमी खूप महत्त्वाची आहे.

यापूर्वी दरवर्षी औद्योगिक आणि व्यावसायिक व्याजदरात सुमारे दहा टक्के वाढ होत होती परंतु आता पुढील पाच वर्षासाठी त्यांना कपातीचा लाभ मिळणार आहे. यामुळे राज्याचे उद्योग आणि व्यवसायांना मोठी चालना मिळणार आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला नवीन बळकटी निर्माण होईल. Mahavitran Electricity Rates

हे पण वाचा| मोठी बातमी! PM किसान योजनेचा 20व्या हप्त्याला उशीर होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर..

स्मार्ट मीटर आणि सौर ऊर्जाला प्रोत्साहन

  • मार्च मीटर वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना दिवसा वीज वापरण्यासाठी दहा टक्के अतिरिक्त टाइम ऑफ डे सवलत मिळेल. यामुळे दिवसा वीज वापरण्यासाठी अधिक बचत करणे शक्य होईल.
  • सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या घरगुती ग्राहकांनीही विशेष प्रोत्साहन देण्यात आले आहे. हा निर्णय अपरंपारिक ऊर्जा स्वतःच्या वापराला प्रोत्साहन देईल आणि पर्यावरणासाठी फायद्याचा ठरेल. Mahavitran Electricity Rates

हे पण वाचा| राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज..! या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी…

शेतकऱ्यांना मोफत आणि दिवसा वीज पुरवठा

राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेमुळे साडेसात एचपी पर्यंतचे पंप असलेल्या राज्यातील 45 लाख शेतकऱ्यांना आधीच मोफत वीज मिळत आहे या निर्णयामुळे त्यांनाही अप्रत्यक्षपणे मोठा फायदा होईल, कारण एकूणच वीज खरेदी खर्च कमी झाल्याने योजनेची व्यवहार्यता आणखीन वाढेल. याशिवाय शेतकऱ्यांसाठी दिवसा खात्रीचा विसपुरवठा मिळण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 सुरू आहे. या योजनेअंतर्गत विकेंद्रीत स्वरूपात सौर ऊर्जाद्वारे वीज तयार करून कृषी पंप चालवले जातात. 16000 मेगा वॅट क्षमतेची ही योजना डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. या योजनेमुळे सरासरी तीन रुपये प्रति युनिट इतक्या कमी दराने वीज उपलब्ध होईल. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि महावितरणाच्या वीज खरेदी खर्चही कमी होईल.

महावितरण ने भविष्यातील विजेची गरज लक्षात घेऊन रिसोर्स ॲडेक्सी प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार 2030 पर्यंत राज्याची विजेची क्षमता 81,000 मेगा वाटपर्यंत नेण्यासाठी पंचवीस हजार मेगावॅटचे वीज खरेदी करार करण्यात आले आहे. यापैकी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 31 हजार मेगावॅट वीज ही नवी करणीय ऊर्जा स्रोत कडून मिळणार आहे. ही वीज अत्यंत किफायती शीर दरात उपलब्ध होणार असल्याने पुढील पाच वर्षात महावितरणाचे वीज खरेदीचे तब्बल 66 हजार कोटी रुपये वाचणार आहेत. याच बचतीमुळे महावितरणाने सर्वप्रथम वीजदर चपातीचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

हे पण वाचा | सोन्याच्या दर 2,700 रुपयांनी घसरले; जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत..

मुख्यमंत्री काय म्हणाले?

वीजदर कपातीचा हा ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाचे विशेष आभार मानले आहे. ते म्हणाले, राज्याच्या इतिहासात प्रथमच दहा टक्के आणि टप्प्याटप्प्याने वीजदर कपात करीत आहोत. पुढील पाच वर्षात 26 टक्के वीजदर कपात होणार आहे. महाराष्ट्र राज्य वीर नियामक आयोगाने हा निकाल महावितरणाच्या याचे केवळ दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. पूर्वी वीज दरासाठी याचिका सादर होत असत मात्र महावितरणाने प्रथमच वीजदर कमी करण्याची याचिका दाखल केली आणि आयोगाने त्यावर सकारात्मक निर्णय दिला याचा त्यांना विशेष आनंद आहे. एकंदरीत हा निर्णय महाराष्ट्रातील कोट्यावधी वीज ग्राहकांसाठी दिलासा देणारा आहे. यामुळे केवळ आर्थिक दिलासा मिळणार नाही तर राज्याच्या विकासाला आणि पर्यावरणाला देखील बळ मिळेल. ग्राहकांना चे चांगल्या दरात दर्जेदार वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण प्रयत्न करत आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रात प्रथमच पुढील पाच वर्षासाठी वीजदर कमी होणार”

Leave a Comment

error: Content is protected !!