Mahila Samruddhi Yojana: विविध राज्यात महिलांना आर्थिकदृष्ट्या प्रबळ बनवण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. याचप्रमाणे आता दिल्ली सरकारने देखील महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा पाऊल उचलला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, उडीसाची सुभद्रा योजना, मध्यप्रदेशची लाडली बहना योजना यासारख्या योजनेच्या अंमलबजावणीनंतर आता दिल्ली सरकार लवकरच महिला समृद्धी योजना सुरू करणार आहे. या योजनेअंतर्गत दिल्लीतील पात्र महिलांना दरमहा 2500 रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे.
हे पण वाचा| आज पासून राज्यात मान्सूनचा जोर वाढणार; या 20 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी! जाणून घ्या हवामान अंदाज
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
महिला समृद्धी योजनेबाबत दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सरकार ही योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे. ही घोषणा दिल्लीतील महिलांसाठी नक्कीच आनंदाची बातमी घेऊन येत आहे. कारण यामुळे त्यांना मोठा आर्थिक पाठबळ मिळणार आहे आणि त्या महिला या आर्थिक पाठबळातून आत्मनिर्भर बनू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलाही दिल्लीतील रहिवासी असणे महत्त्वाचे आहे. तुम्ही देखील या योजनेसाठी पात्र असाल तर या योजनेअंतर्गत अर्ज करून 2500 रुपयांचा मानसिक लाभ घेऊ शकतात.
या योजनेच्या अंमलबजावणीत एक प्रमुख आवाहन म्हणजे गेल्या 12 14 दिवसापासून दिल्लीतील नवीन रेशन कार्ड जारी न होणे. यामुळे अनेक कल्याणकारी योजनेमध्ये नवीन लाभार्थी जोडणे कठीण झाले आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या समस्येची दखल घेतली असून, रेशन कार्ड नसलेल्या पात्र महिलांनाही या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याचा अर्थ केवळ रेशन कार्डधारक महिलांनाच नव्हे तर ज्या महिलांकडे रेशन कार्ड नाही परंतु त्या योजनेसाठी पात्र आहेत अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे.
हे पण वाचा| महाराष्ट्रात या तारखेपासून पावसाचा जोर वाढणार; पंजाबराव डख यांचा अंदाज आणि हवामान विभागाचा इशारा
5100 कोटीचा निधी मंजूर
यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपने आपल्या जाहीरनाम्यामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकातील महिलांना 2500 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. आता दिल्ली सरकारने 2025–26 च्या अर्थसंकल्पात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 5100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अतिशय महत्त्वाचा ठरत आहे. Mahila Samruddhi Yojana
दरम्यान महिला समृद्धी योजना ही दिल्लीतील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. दिल्ली सरकार या योजनेला प्रत्यक्षात राबवण्यासाठी वेगाने काम करत असून लवकरच ही योजना सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. या योजनेमुळे हजारो महिलांना थेट आर्थिक लाभ मिळेल आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात सुधारणा होईल. दिल्लीतील या नवीन योजनेचा कोणत्या महिलेला किती फायदा होईल आणि या योजनेचा लाभ योग्य महिलांपर्यंत पोहोचेल का? याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
1 thought on “या महिलांना मिळणार 2,500 रुपये; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा…”